चोरवड यात्रेला सोमवार पासून सुरुवात ; ४०० वर्षाची परंपरा….

पारोळा प्रतिनिधी –

श्री दत्तप्रभूंचे जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या तालुक्यातील चोरवड यात्रेस सोमवार दि २५ पासून सुरुवात होत आहे.
मार्गशीर्ष महिन्यात सदर यात्रेस विशेष महत्व असून मागील ४०० वर्षाची परंपरा कायम आहे.

पारोळा पासून १३ किमी अंतरावर चोरवड हे गाव आहे. गावाच्या पश्चिम दिशेला श्री दत्त महाराज यांचे पुरातन मंदिर आहे. एक लहान व एक मोठे मंदिर असून दोन्ही मंदिरात ई.स १६०२ मध्ये दत्ताची मूर्ती स्थापन केल्याचा इतिहास आहे. महानुभाव पंथाचे एकमुखी दत्ताचे हे खान्देशात एकमेव स्थान असून दहा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी लाखो भक्त राज्यातून येथे मुक्कामी येत असतात.दरम्यान, श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी व यात्रेसाठी तसेच नवस फेडण्यासाठी भाविक येथे येत असल्यामुळे पारोळा बस विभागाकडून जादा विशेष बसेस सोडल्या जातात,त्या मुळे भक्तांची प्रचंड गर्दी यात्रेत दिसून येते.असे असले तरी चोरवड लगत परीसरात भोंडण, पोपटनगर,मंगरूळ,वलवाडी आदी परिसरातील नागरिक आजही बैल गाडीवर सह कुटुंब येणे पसंद करतात.
या आठ दिवस चालणाऱ्या सदर यात्रेसाठी लहान-मोठे झुले पाळणे,करमणूकी साठी विविध स्टॉल,खाद्य पदार्थांची दुकाने, गाड्या थाटल्या जातात.यात्रेत येनाऱ्या भाविकांना सरपंच राकेश पाटील यांच्या सह पोलिस पाटील, ग्रा.प.सदस्य,ग्रामसेवक तलाठी यांचे सहकार्य लाभत असते.


असा आहे मंदिराचा इतिहास

येथील रावजी बुवा यांच्या झोळीत आलेल्या फुलांचे रूपांतर दत्ताच्या मूर्तीत आल्याची आख्यायिका सर्वश्रुत आहे,यात मोठे दत्त मंदिर १५० वर्ष छत नसताना उभे होते त्या नंतर एकाच रात्रीत सदर छत बांधले गेल्याचे ग्रामस्थ सांगतात.तर लहान मंदिरा शेजारी औदुंबराचे झाड असून यात्रा दरम्यान भूत, पिशाच यांचे डोक्यावरील उरे औदुंबरास बांधली जातात असा मोठा इतिहास या मंदिराचा असून जिथे सायन्स थांबते तिथे दुवा सुरू होते असा विश्वास पंचक्रोशीतील भक्त गणांचा आजही टिकून असल्याने लाखो भक्तांची मांदियाळी यात्रे दरम्यान दिसून येते.
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!