लोककलावंतांना मिळणार आर्थिक मदत – लोकशाहीर उत्तमराव गायकर….

नाशिक प्रतिनिधी –

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचानालय या विभागाने परिपत्रक काढून कोविड-19 पार्श्वभूमीवर कलाकारांना आर्थिक मदत ५००० रुपये जाहीर केले असून ज्यांचं वय ३० वर्षाच्या पुढे असणाऱ्या लोककलावंतांनी एकल कलाकारांसाठी एकरकमी विशेष कोविड अनुदान पॅकेजसाठी लवकरात लवकर तालुक्याच्या तहसील कार्यालय व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे आपले अर्ज पूर्ण भरून दोन्ही ठिकाणी द्यावेत.असे आवाहन भारत सरकार व महाराष्ट्र शासन पुरस्कृत तथा मा.राज्यपालांच्या हस्ते सन्मानित शाहीर उत्तम गायकर यांनी केले आहे .
याकरिता विहित नमुन्यातील अर्ज १५ वर्ष महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला ,५०,००० हजार रुपयेच्या आतील उत्पन्नाचा दाखला , कलाक्षेत्रातील १५ वर्षे कार्यरत असल्याचा पुरावा ,आधार कार्ड , पॅन कार्ड ,बँकेचे पासबुक, शिधापत्रिका व प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे .याकरिता शेवटची मुदत ३१ जानेवारी आहे .
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे मानधन घेणाऱ्या कलावंतांनी अर्ज करू नये.अधिक माहिती करता ९८५०६५४०८४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शाहीर उत्तम रामचंद्र गायकर यांनी केले आहे .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!