बांधकाम साईट वर तिसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू….

नाशिक शहर प्रतिनिधी – ( राजेंद्र दोंदे )

बांधकामाच्या साईटवर मजुरीचे काम करीत असताना मजुर किरण वाल्मीक कुमावत वय २८ रा. अंबड लिंक रोड, कामटवाडा, डि.जी.पी. नगर या मजुराचे तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन डोक्याला गंभीर मार लागला ट्यात त्याचा मृत्यु झाला. किरण कुमावत हा हर्ष अपार्टमेंट, लभडे नगर, जत्रा हॉटेल जवळ, असलेल्या साईट वर काम करीत होता. त्याचे मेव्हणे दगडु बेलदार यांनी त्यास लोकमान्य हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!