नेहरु युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना जळगांव अंतर्गत पिंप्राळा हुडको परिसर येथे स्वच्छ भारत अभियान…

दैनिक महाराष्ट्र सारथी विजय सपकाळे कानडदा प्रतिनिधी

नेहरु युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना जळगांव यांचा स्वच्छता मोहीम उपक्रम संपन्न.

जळगाव-नेहरु युवा केंद्र जळगांव अंतर्गत “आझादी का अमृत महोत्सवा” निमित्त स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. यामध्ये पिंप्राळा हुडको परिसरात प्लास्टिक संकलन करण्यात आले या वेळी नेहरु युवा केंद्र जळगांव व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक रोहन अवचारे व युथ क्लब सदस्य सामाजिक कार्यकर्ते राजू निकम, सुमित सोनवणे, महानगर पालिकेचे सुपरवायझर मुकेश थांबत , आनंद मरसाळे, व कर्मचारी रत्‍नाबाई सोनवणे, रेखाबाई सुरवाडे, प्रमिलाबाई अहिरे , दीपक जाधव, ज्ञानेश्वर भालेराव ,छगन भालेराव , भीमराव थोरात, ह्यांची उपस्थिती होती.

परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की महानगर पालिकेची कचऱ्याची गाडी नेहमी आपल्या घरासमोर येत असते व तो कचरा उघड्यावर न टाकता घंटा गाडीतच टाकावा असे आवाहन परिसरातील सर्व नागरिकांना करण्यात आले.

आपल्या परिसरातील बातम्यां करिता दैनिक महाराष्ट्र सारथी चे विजय सपकाळे कानडदा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!