वर्ल्ड वाइल्ड प्लांटेशन वृक्षारोपन कार्यात उष्कृष्ठ कार्य केल्याने महाराष्ट्रातील बारा निसर्ग व पर्यावरण प्रेमी यांना आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान…

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी..

भुसावळ : काल झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डेप्युटी सेक्रेटरी म्रिंगका अचल, लोकसभा भारत सरकार, डीसीएम, इओआय बशीर अहमद राजदूत जकार्ता इंडोनेशिया, पद्मश्री प्राप्त कवी सत्येंद्र शर्मा, पद्मश्री प्राप्त के एस रावत, आय.ए.एफ एअर कंमाडर डॉ. अश्मीदर बहल, भारतीय आर्मीचे मेजर जनरल विक्रम देव डोग्रा, रेडीओ मेरी आवाज चे सीईओ अमित चौधरी, शैक्षिक आगाज च्या संस्थापिका स्मृर्ती चौधरी, लिटल हेल्प च्या संचालिका समृद्धि चौधरी, ओमान हून मिनल देवरा यांच्या प्रमुख उपस्थित काल झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात सुरवातीला संस्कृत संरस्वती वंदना सादर करून दिप प्रज्वलन करण्यात आले . प्रमुख पाहुण्याचा परिचय करण्यात आला . राजस्थान मधील चरीत दिक्षीत यांनी राजस्थानी लोकगीत सादर केले . यानंतर लिटील हेल्प या संस्थेच्या संस्थापिका छोटी मुलगी समृद्धी चौधरी हिने ही संस्था कशी स्थापन झाली अतिशय अप्रतिम शब्दात पण भावना प्रधान शब्दात सांगितले . यानंतर रेडीओ मेरी आवाज चें सिईओ अमित चौधरी यांनी रेडीओ मेरी आवाज मार्फत देश परदेशात कसे कार्य सुरु आहे आणि पर्यावरण क्षेत्रातही कार्य कसे करते याविषयी माहीती दिली .

स्मृर्ती चौधरी यांनी शैक्षिक आगाज माध्यमातून शैक्षणिक विचारांची देवाण घेवाण व विविध उपक्रम शिक्षकांन मार्फत निसर्ग पर्यावरण सारखे उपक्रम ची माहिती दिली . त्यानंतर छत्तीसगड च्या प्रसिद्ध लोकगीत गायिका प्रभा जोशी यांनी लोक गीत सादर केले. नंतर स्मृती चौधरी यांनी विविध राज्यातील व परदेशातील टिम लिडर्स यांची ओळख करून देतांना वर्ल्ड वाईड प्लांटेशन कार्यात एक लाख तेरा
हजार झाडे लावण्याच्या कार्यात नाना पाटील याच्या मार्गदर्शनाखाली सर्वात जास्त महाराष्ट्राने एकतीश हजार झाडाचे वृक्षारोपण एकाच दिवसात करण्यात आल्याने महराष्ट्र टिमचे विशेष कौतुक करण्यात आले यात वृक्षमित्र आबासाहेब मोरे नगर ,रानमळा पॅटर्न चे वनश्री प्राप्त पी टी शिंदे अण्णा, राज्य समन्वयक महिला पर्यावरण सखी मंच व वर्ल्ड वाईड प्लांटेशन चे महाराष्ट्र टिम लिडर नाना पाटील सर भुसावळ, प्रियवंदा तांबोटकर रायगड, जिल्हा कार्याध्यक्षा मनिषा पाटील जळगाव, स्वाती धोटकर चंद्रपूर, दीपा गिरी नांदेड, सुमन जीरोनेकर नांदेड, सुरेन्द्रसिंग पाटील भुसावळ, सत्येंद्र पांडे पुणे, सेलिना अहमद नागपूर, अलका भटकर जळगाव या सर्वाना पर्यावरण मित्र पुरस्कार मान्यवराच्या उपस्थित ऑनलाईन देण्यात आले .

या कार्यक्रमात प्रमुख पाहुयांनी भविष्यात येणारी संकटे दूर करावयाचे असल्यास वृक्ष लावून संवर्धन करणे आवश्यक आहे . या कार्यक्रमात विविध राज्याचे लोकगीत सादर करण्यात आली पद्मश्री सत्येंद शर्मा यांनी सुंदर कविता पेश केली चाललेल्या या तीन तासाच्या कार्यकमा ला देशातून व देशाबाहेरून शंभर पेक्षा जास्त पर्यावरण प्रेमी या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते . ओमान च्या मिनल देवरा यांनी आभार मानले .

वृक्ष संवर्धन काळाची गरज झाडे लावा झाडे जगवा
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!