तिच्या सौंदर्याची भुरळ पडली महागात, खरं रुप पाहून डॉक्टरच नाही तर पोलीसही चक्रावले

यवतमाळ,

सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर आपले मनोरंजन तर होतेच, त्याचबरोबर आपल्याला नवीन लोकं किंवा मित्र ही मिळतात. परंतु सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे देखील आहेत. कारण यामुळे अनेक लोक फसली आहे. साध्या सरळ माणसांपासून ते भल्याभल्यांपर्यंत अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून गंडा घालण्यात आला आहे.

दिल्लीच्या एका मोठ्या डॉक्टर सोबत देखील असंच काहीसं घडलं आहे. सोशल मीडियावर एका महिलेशी गप्पा मारता-मारता एक डॉक्टर मोठ्या सापळ्यात अडकला. त्याची मैत्री इतकी पुढे गेली की, त्यांची पैशांची देवान घेवाण देखील सुरू झाली. ज्यानंतर या महिलेनं डॉक्टरांकडून दोन कोटी रुपये लूटले.

जेव्हा डॉक्टरच्या हे लक्षात आले तेव्हा त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली, ज्यामुळे 24 तासात आरोपीला पकडले गेले. परंतु खर्‍या आरोपीला पाहाताच पोलिस देखील चक्रावले. कारण ज्याच्या रुपावर हा डॉक्टर भूलला होता तो आरोपी मुलगी नसून एक मुलगा होता.

महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये बसलेला आरोपी दिल्लीतील एका नामांकित हॉस्पिटलच्या एका मोठ्या डॉक्टरला अडकवून त्याच्याकडून पैसे लूटत होता. परंतु डॉक्टरच्या तक्रारीवरुन आता तो आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

महाराष्ट्रातील यवतमाळ येथे राहणार्‍या एका महिलेने दिल्लीतील एका नामांकित हॉस्पिटलमधील एका मोठ्या डॉक्टरची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तेव्हा या विरोधाक पोलिसात तक्रार मिळाली असता पोलिसांनी आरोपीला 24 तासात शोधून काढले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून या आरोपीने डॉक्टरशी मैत्री वाढवली. गप्पा मारताना डॉक्टरला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि सुमारे दोन कोटी रुपये आणि काही दागिने लुटले. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा या प्रकरणाचा तपास यवतमाळच्या अरुणोदय सोसायटीपर्यंत पोहोचला. अनन्या सिंह नावाची व्यक्ती शोधण्यासाठी जेव्हा त्यांनी अरुणोदय सोसायटीमधील आरोपीच्या घराचं दार ठोठावलं तेव्हा आतून अनन्या नाही तर संदेश मानकर नावाचा व्यक्ती बाहेर आली.

आरोपींकडून 1 कोटी 76 लाख 6 हजार 198 रुपयांचे रोख आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली.

शनिवारी झालेल्या या कारवाईनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी पोलीस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत संपूर्ण माहिती दिली. या आरोपीने सांगितले की, फमी एका मोठ्या कुटुंबातील आहे. माझे कुटुंब सध्या अडचणीत आहे. मला दोन कोटी रुपयांची गरज आहे. माझ्या बहिणीचे अपहरण झाले आहे. मला समोरच्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत.‘

असे म्हणत अनन्या शर्मा उर्फ ?संदेश मानकरने डॉक्टरकडून पैसे वसूल केले. एवढेच नव्हे तर त्याने यवतमाळ शहरातील दोन दागिन्यांच्या दुकानातून ठढॠड द्वारे सोन्याचे दागिने खरेदी केले.

डॉक्टरला धक्का

दरम्यान, आरोपीने अनन्या सिंगच्या नावाने अचानक त्याचे सोशल मीडियावरील खाते बंद केले. यानंतर डॉक्टरांना समजले की, त्याच्यासोबत सूट झाली आहे. त्यानंतर त्यांनी थेट यवतमाळचे पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्याकडे तक्रार केली आणि संपूर्ण प्रकरण त्यांना सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!