आता संजय राठोड यांची बारी, ’त्या’ महिलेच्या आरोपांबाबत पोलीस नोंदवणार जबाब!

यवतमाळ

शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका महिलेनं पोलिसांना पत्र पाठवून गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आता संजय राठोड यांचा सुद्धा जबाब नोंदवला जाणार आहे.

एका महिलेनं संजय राठोड यांच्यावर  शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात पोस्टाने पाठवली होती.  या प्रकरणी एसआयटीची स्थापन करण्यात आली होती. त्यात ज्या महिलेने तक्रार दिली त्या महिलेचे सुद्धा जबाब घाटंजी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या बुधवारी संजय राठोड याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. एसआयटी समिती पीडित महिला आणि संजय राठोड यांचा जबाब तपासून अहवाल देणार आहे. त्यानंतर माध्यमांना सदर प्रकरणातील वस्तुस्थिती सांगितली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.

तर, या महिलेच्या पत्राची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी तत्काळ विशेष चौकशी पथकाचे गठन केले. शुक्रवारी एसआयटीने बयान नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांची प्रकृती बरोबर नाही. माझीही मनस्थिती बरोबर नाही, असे निवेदन पोलिसांना दिले होते. अखेर 14 आ‘गस्ट रोजी जबाब देण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या महिलेची बंददाराआड दोन चौकशी करण्यात  आली.

पतीला नोकरीवर पूर्ववत घेण्यासाठी माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीर सुखाची मागणी केली, असा गंभीर आरोप या महिलेने घाटंजी पोलीस ठाण्यात पाठविलेल्या तक्रारीत केला आहे. ही तक्रार घाटनजी पोलिसांनी जिल्हा अधीक्षक कार्यालयाला पाठवून या बाबत कारवाई संदर्भात मार्गदर्शन मागण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नि दिली. माजी मंत्री संजय राठोड याच्या संस्थेवर 3 शिक्षक कार्यरत होते. दरम्यान गैरवर्तवणुकीमुळे त्या शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर एका शिक्षणाच्या पत्नीने, पतीला पूर्ववत  कामावर घेण्यात यावे यासाठी धमकी दिली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर मोबाईलवर मेसेज ही पाठवले. मात्र तिच्या पतीला कामावर घेतले नाही. या प्रकरणात या महिलेने घाटंजी पोलिसांना पोस्टाद्वारे तक्रार पाठवून संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला. या आरोप नंतर भाजपा नेत्या चित्रा

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!