भुसावळात रिक्षा भाडे महागले

भुसावळ (प्रतिनिधी)

भुसावळ शहरातील रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने बुधवार पासून भुसावळातील रिक्षा भाडे २० रू प्रती सीट करण्यात आले.
पट्रोल चे वाढते दर पाहता व शहरातील पडलेल्या खड्डयांमुळे रिक्षा चालकांनी हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे.यावेळी सर्व रिक्षांना २० रु प्रती सिट चे बोर्ड भुसावळ चे भावी आमदार शहीद टिपू सुलतान सेना रिक्षा चालक मालक युनियन चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. जगन भाई सोनवणे,राकेश बग्गन यांनी लावले. याप्रसंगी हरीष सुरवाडे,जयराज उर्भी,चंद्रकांत भागेश्वर,पंकज पाठक,महेंद्र खडसे,सद्दाम पिंजारी,सुनिल मोरे,मुकेश बाळसराफ,अतुल सपकाळे,प्रविन परदेशी,श्याम सकट यांच्या सह रिक्षा चालक उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!