पारोळ्यात घराला भिषण आग – कोट्यवधींचे नुकसान..

पारोळा प्रतिनिधी –

येथील नगरसेवक मनोज जगदाळे यांचा राहत्या घराला सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली.यात त्यांचा दुकानाचे साहित्य,बुलेट गाडी,संसारोपयोगी व मौल्यवान वस्तू असे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

येथील खांडेकर वाड्यात नगरसेवक मनोज जगदाळे यांचे घर असुन शहरात त्यांचा गजानन इलेक्ट्रॉनिक अँड फर्निचर दुकानाचा व्यवसाय आहे.दिनांक १३ रोजी सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास त्यांचा राहत्या घराला अचानक भीषण आग लागली.क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले.आग विझविण्यासाठी पारोळा,एरंडोल,धरणगाव, अमळनेर येथील अग्निशामक बंबला पाचारण करण्यात आले. तब्बल अडीच ते तीन तासानंतर शर्तीचे प्रयत्नांतून आग विझवण्यात अग्निशामक पथकाला यश आले.या आगीत सुदैवाने जीवित हानी टळली आहे.मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांचा दुकानाचे फ्रीज, कुलर,ए सी,एलइडी सह इतर साहित्य,बुलेट गाडी,संसारोपयोगी व मौल्यवान वस्तू या आगीत जळून खाक झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे वर्तविण्यात आले आहे.आगीचे कारण नेमके समजू शकले नाही. दरम्यान,आग एव्हढी भीषण होती की तिचा धुर सर्वत्र पसरल्याने ते पाहण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती.घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, गोपनीय शाखेचे महेश पाटील, अभिजीत पाटील,सुधीर चौधरी यांनी गर्दी आटोक्यात आणून मदत कार्यास हातभार लावला.

  • जीवितहानी टळली
  • आग लागली त्यावेळी महीला व मुले घरातच होती. मुख्य दरवाजा कडून समोरूनच आगीचा लोड येत असल्याने त्यांना घराबाहेर पडणे अशक्य झाले.यावेळी त्यांना गॅलरीतून मागचा बाजूने सिडी व दोराचा साहाय्याने नागरिकांनी बाहेर काढल्याने जीवितहानी टळली.
  • आग आटोक्यातसाठी शर्तीचे प्रयत्न
  • दरम्यान,आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आणणे कठीण झाले,आग आटोक्यात आणण्यासाठी पारोळा, अमळनेर,एरंडोल,धरणगाव अग्निशामक बंब तसेच मिनी अग्निशामक बंब व पाण्याचे टँकर यांचाने प्रत्येकी दोन ते तीन वेळेस शर्तीचे प्रयत्न केले,तद्नंतर तब्बल अडीच ते तीन तासानंतर आग आटोक्यात आली.मात्र तोपर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाले होते.
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!