शिंदखेडा तालुक्यात 13 पैकी 11 ग्रामपंचायतीवर नागरिकांची भाजपाला नंबर एक ची पसंती -आमदार जयकुमार रावलांचे वर्चस्व कायम….

शिंदखेडा प्रतिनिधी –

तालुक्यात रविवारी ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यात एकूण १३ ग्रामपंचायतीची लोकनियुक्त सरपंच व सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती.सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.आज सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती निकलाअंती १३ ग्रामपंचायती पैकी ११ ग्रामपंचायत भाजपा कडे तर १ जागा राष्ट्रवादी काँग्रेस व एक जागा स्थानिक आघाडी ला मिळाली असल्याने पुन्हा ग्रामपंचायती च्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्यावर जयकुमार रावल यांचे वर्चस्व सिद्ध झाले.
भाजपा तालुका कार्यालयात भाजपा चे कृउबा सभापती नारायण पाटील, कामराज निकम, तालुकाध्यक्ष बागुल सह पदाधिकारी व कार्यकर्त्यानी जल्लोष व्यक्त केला.आज सकाळी दहा वाजेपासून तहसील कार्यालयात तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे,नायब तहसिलदार बन्सीलाल वाडिले,एस.बी.राणे ,शारदा बागले पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या देखरेखीखाली मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली. पहिल्या फेरीत मांडळ, गव्हाणे/ शिराळे, होळ प्र.बे, वाडी, वाघोदे, साळवे यांची मतमोजणी तर परसामळ/ कुमरेज, कंचनपुर, कदाणे, वालखेडा, तावखेडा प्र बे दुसऱ्या फेरीत मतमोजणी प्रक्रिया घेण्यात आली.पहिला निकाल मांडळ ग्रामपंचायत चा लागला.यावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दिपक पाटील ,नरडाणा बेंद्रे ,दोंडाईचा श्रीराम पवार यासह पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार, कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

……………………………
निवडून आलेले लोकनियुक्त सरपंच या प्रमाणे
परसामळ अनु.जाती जमाती महिला सरपंच नगराळे कलाबाई साहेबराव (मिळालेली मते ६९०),
वाडी सरपंच गिरासे सुवर्णसिंह कोमलसिंह (मिळालेली मते ५२९)
तावखेडा सरपंच सर्वसाधारण स्त्री जाधव लताबाई प्रकाश (मिळालेली मते ६७२)
साळवे सरपंच नमाप्र स्त्री वाघ उषाबाई संतोष (मिळालेली मते ९९६)
वालखेडा सरपंच सर्वसाधारण स्त्री पाटील शैलजा किशोर (मिळालेली मते १३०६)
कदाने सरपंच सर्वसाधारण पाटील रावसाहेब श्रीराम (मिळालेली मते ५९१)
गव्हाणे सरपंच अनु.जमाती स्त्री भिल आशाबाई मधू (मिळालेली मते ८९९)
होळ सरपंच सर्वसाधारण स्त्री पाटील दिपाली भटू (मिळालेली मते ११७३)
वाघोदे सरपंच अनु. जमाती महिला बागुल राजबाई रविंद्र (मिळालेली मते ५२९)
कंचनपुर सरपंच सर्वसाधारण पाटील गणेश बन्सीलाल (मिळालेली मते ४७२)

मांडळ सरपंच अनु. जमाती महिला आखाडे रमाबाई वामन (मिळालेली मते ८२७)

भारतीय जनता पार्टीला नंबर एकची पसंती तमाम जनतेने दिलेली आहे पूर्ण महाराष्ट्रात भाजपा नंबर एक असताना माझ्या मतदारसंघात 13 पैकी 11 ग्रामपंचायतीवर भाजपाला एकतर्फी निकाल दिल्याबद्दल मी माझ्या मतदारसंघातील तमाम जनतेचे आभार व्यक्त करतो.
माजी मंत्री,आमदार जयकुमार रावल

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!