राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त व्याख्याते समाधान हेंगडे पाटील यांचे सुरत गुजरात येथे व्याख्यान….

नाशिक प्रतिनिधी –

जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. गुलामगिरीच्या छाताडावर पाय रोवून परकीय सत्तांची पाळेमुळे उखडून टाखली. आणि रयतेचे राज्य निर्माण केले. त्यामुळे जनसामान्य माणूस आज छत्रपती शिवाजी महाराजांची पिढ्या न पिठ्यापासून प्रेरणा घेऊन जगत आहेत. पण महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागे जिजाऊंच्या त्यागाचा,संघर्षाचा, संस्कारांचा फार मोठा वाटा होता. असे सुरत गुजरात येथील जिजाऊ माता जयंती निमित्त बोलताना व्याख्याते श्री.समाधान हेंगडे पाटील म्हणाले.

12 जानेवारी 2023 रोजी शिवछत्रपतींच्या माता जिजाऊ मासाहेब यांची जयंती शिवकार्य मावळे सुरत गुजरात यांच्या माध्यमातून सुरत शहरात आयोजित केलेली होती सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरत शहरातून प्रचंड मोठी शिवशाही रॅली काढण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून मराठी संस्कृती आणि शिवछत्रपतींची विचारधारा मासाहेब जिजाऊंचे संस्कार जनसामान्य माणसापर्यंत पोहोचावे यासाठी सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी 9 वाजेला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लिंबायत सुरत या ठिकाणी भव्य व्याख्यानाच्या आयोजन करण्यात आले होते या व्याख्यानासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते श्री समाधान चंद्रभान हेंगडे पाटील (मखमलाबाद, नाशिक) यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

सदर कार्यक्रम शिवकार्य मावळे सुरत यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेला होता या शिवकार्य मावळे सुरत द्वारा मागील चार वर्षापासून अविरतपणे 365 दिवस शिवछत्रपतींची नित्य जलाभिषेक पूजा करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाते, तसेच गडकिल्ले संवर्धन केले जाते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते समाधान हेंगडे पाटील उपस्थित होते, तर सुरत शहरातील मोठ्या संख्येने मावळे उपस्थित होते सदर कार्यक्रमात शिवकार्य मावळे सुरत चे कार्यकर्ते शरद पाटील, निवृत्ती पाटील , सुनील पाटील , महेश पाटील, अशी सर्वच मंडळी उपस्थित होते शिवशाही वातावरणात जिजाऊ मासाहेब जन्मोत्सव सोहळा सुरत गुजरात या ठिकाणी पार पडला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!