सिन्नर – शिर्डी महामार्गावर खाजगी बस व ट्रक चा भिषण अपघात….

नाशिक प्रतिनिधी – ( राजेंद्र दोंदे )

नाशिक सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे जवळ आज दिनांक १३ रोजी खाजगी बस व ट्रक यांच्यात समोरासमोर भिषण अपघात होवुन, या अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक समोर आली असुन मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर – शिर्डी महामार्गावर पाथरे जवळ इशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास भिषण अपघात होवुन दहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. खाजगी आराम बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक होवुन हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई येथून शिर्डी कडे जाणारी खाजगी बस आणि शिर्डी कडून सिन्नरकडे जाणारा मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होवुन अपघात झाला. पाथरे ते पिंपळ वाडी दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरामधील सुमारे ५० प्रवाशी या बस मधून शिर्डीकडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथून सुमारे १५ बस साई दर्शनासाठी शिर्डी कडे जात असताना त्यातील एक बस ला हा अपघात झाला. बस मधील अनेक प्रवाशी जखमी झाले असून जखमींना नाशिक आणि सिन्नर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वावी पोलीस घटनास्थळी पोहोचले असुन मदत कार्य जोमाने सुरू आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!