मराठा,ओबीसी,धनगर,मुस्लीम आरक्षणासाठी खंडाळा तालुक्यात संवाद बैठकीचे आयोजन.-युवा नेते ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील करणार नेतृत्व :सर्वपक्षीय कार्यकत्यांचा समावेश.

हेमंत धायगुडे पाटील
खंडाळा : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून खंडाळा तालुक्यात ‘साद बहुजनांच्या हक्कासाठी बहुजनांच्या विकासासाठी’ या उक्ती प्रमाणे मराठा,ओबीसी,
धनगर,मुस्लीम आरक्षणासाठी संवाद बैठकीचे आयोजन खंडाळा तालुक्याचे आयडॉल तरुणांचे प्रेरणास्थान,जेष्ठांचा आधारवड,दमदार नेतृत्व आदरणीय कुमार ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील यांच्यावतीने तालुक्यातील गावात गाव भेट दौरा आयोजित करण्यात आलेला आहे.

या गाव भेट दौऱ्याची सुरवात दि.२७ जून २०२१ पासून घाटदरे गावातून ठिक संध्याकाळी ७.००वाजता केली जाणार आहे.
महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज पर्यंत तब्बल ५८ मोर्चे निघाले. परंतु मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध न करता आल्याने सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारले.हा आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होणे गरजेचे आहे. ओबीसी,एस.सी.,एस.टी.,एन. टी.एस.बी.सी.,इतर समाजाच्या शासकीय नोकऱ्यांमधील बढत्या २०१७ पासून थांबवण्यात आल्या आहेत.या सर्व मागणीसाठी खंडाळा तालुक्यातील युवक,
युवती,बंधू-भगिंनी या सर्वानी आरक्षणाच्या लढाईत सहभागी होऊन आपल्या सर्व मागण्या सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी प्रस्थापिथांच्या जुलमी राजवटीतून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गोवोगावी होणार्‍या सुसंवाद बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.

स्वाभिमानी लढ्यात सहभागी व्हावे

खंडाळा तालुक्यातील मराठा, ओबीसी,धनगर,मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी गाववार संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.ज्या लोकांनी राज सत्तेचा मार्ग सुकर करून सत्तेच्या चाव्या प्रस्थापिथांच्या हातात दिल्या.त्याच लोकांना आज हेच प्रस्थापित लोक संपवू पहात आहे.जो मराठा,ओबीसी,धनगर,
मुस्लीम,एस.सी.,एस.टी.,एन. टी.एस.बी.सी समाज पूर्वी राज्यकर्ता होता.आज त्याच्यांच अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.शिक्षण नसल्याने शिक्षणापासून वंचित,राजकीय आरक्षण नसल्यामुळे बहुजन समाज सत्तेपासून दूर,मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण नसल्यामुळे विद्यार्थी उच्च शिक्षणासापासून वंचित राहावे लागत आहे.या तिहेरी संकटांचा मुकाबला करण्यासाठी व प्रस्थापितांना रोखठोक जाब विचारण्यासाठी मराठा -बहुजन-धनगर-मुस्लीम जागर अभियानाच्या माध्यमातून ‘उपेक्षित समाजाला न्याय हक्क’ मिळवून देण्यासाठी आपण सर्वानी या आरक्षणाच्या संघर्षमय
स्वाभिमानी लढ्यात सहभागी व्हावे. असे आव्हान ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील युवा नेता,खंडाळा तालुका यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!