आ. कैलास गोरंट्याल यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुर झालेल्या कन्हैयानगर ते बाबुराव काळे रस्त्याच्या कामाचे आज पालकमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते भुमिपुजन

जालना,

आ. कैलास गोरंट्याल यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुर करण्यात आलेल्या जालना शहरातील कन्हैयानगर चौफुली ते बाबुराव काळे चौक या सिमेंट रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन दि. 23 ऑक्टोबर शनिवार रोजी दुपारी 2 वाजता राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.

कन्हैयानगर चौफुली येथे आयोजीत करण्यात आलेल्या या भुमिपुजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे राहणार असून आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांच्यासह व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतिष पंच, उद्योजक ओमप्रकाश मंत्री, शांतीलाल चोरडीया, जेपीसी बँकेचे अध्यक्ष दिपक भुरेवाल, उपनगराध्यक्षा अन्सारी फरहाना रहिम, बांधकाम सभापती सय्यद फरहिन अजहर, नगरसेविका संगीता पाजगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ओमप्रकाश चांडक, उप अभियंता चंद्रशेखर नागरे यांच्यासह सय्यद अजहर, संजय गायकवाड, विनोद यादव, सय्यद जमिल, शेख शमशोद्दीन, सय्यद नईम, सय्यद जमिल यांनी केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!