सांगली : महिला कर्मचार्‍यानेच मारला ’अ‍ॅमेझॉन’च्या 28 लाखांवर डल्ला, गुन्हा दाखल

सांगली,

अमेझॉन कंपनीची तब्बल 28 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगलीमधील अ‍ॅमेझॉन कंपनीच्या महिला कर्मचार्‍याकडून ही फसवणूक झाली आहे. याप्रकरणी भाग्यश्री पावले या संशयित महिलेविरोधात संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सांगलीच्या बालाजीनगर येथे अमेझॉन कंपनीचे ट्रान्सपोर्ट कार्यालय आहे. येथून ऑॅनलाइन खरेदी केलेल्या वस्तू घरपोच करणार्‍या एका महिला कर्मचारयाने कंपनीची 28 लाख रुपयांची रक्कम हडप केल्याचा प्रकार घडला आहे. ग-ाहकांच्या घरी वस्तू पोहोच केल्यानंतर पैसे घेतले जातात. जर सुट्टे पैसे नसतील, तर ग-ाहकाच्या खात्यावर कंपनीकडून पैसे वर्ग केले जातात. याचा फायदा उचलत संशयित भाग्यश्री पावले या महिलेने 111 ग-ाहकांच्या खात्यावर अधिकचे पैसे जमा करून ते रोखीने परत घेतले. कंपनीच्या नोव्हेंबर 2020 ते एप्रिल 2021मधील लेखा परीक्षण अहवालात ही बाब समोर आली. त्यानंतर ट्रान्सपोर्ट कंपनीचे केतन वाघ यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात संशयित भाग्यश्री पावले या महिलेविरोधात कंपनीच्या 28 लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

संशयित भाग्यश्री पावले अ‍ॅमेझॉन कंपनीच्या इंटेक्स ट्रान्सपोर्टमध्ये कर्मचारी आहेत. या महिलेकडे अ‍ॅमेझॉन कंपनीचे परतावा करणारे अ‍ॅप आहे. एखाद्या ग-ाहकाकडे जर वस्तू पोहोच करण्यासाठी गेले असता ग-ाहकाला परत सुट्टे पैसे देण्यासाठी पैसे नसतील, तर कंपनीच्या अ‍ॅपवरून ग-ाहकाचे उरलेले परत करण्यात येतात. या महिलेने याचा फायदा उचलत अमेझॉन ऑॅनलाइनवरून खरेदी करणार्‍या ग-ाहकांना अधिक रकमेचा परतावा करत ग-ाहकाकडून परतावा करण्यात आलेली रक्कम परत घेत जवळपास 28 लाखांवर डल्ला मारला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!