डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे गुरुपौर्णिमेला गुरुजनांचा सत्कार….

जळगाव –

भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे सद्गुण अंगीकारणे, अवगुण त्यागणेआणि ज्ञानप्राप्ती करणे या उद्दिष्टाने आषाढ शुद्ध पौर्णिमेला अर्थात व्यासपौर्णिमेला दि.१३ ते १५ जुलै २०२२ कालावधीत निष्कलंक, अजातशत्रु , निर्लेप समाजसेवी गुरुजनांचा प्रत्यक्ष घरी जाऊन भावपूर्ण सत्कार करीत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
प्रारंभीअध्यापक विद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक गुरुवर्य वसंत सरोदे यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथभेट देऊन सपत्नीक गुरुमाऊली निवृत्त माध्यमिक शिक्षिका सौ.शैलजाजी सरोदे उभयतांचा हृद्य सत्कार भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांच्या हस्त करण्यात आला. त्यांनी उभयतांचे नतमस्तक होत गुरुवंदन करून शुभाशिर्वाद घेत निरोगी, निरामय दिर्घायुष्यासाठी निर्मिकाला प्रार्थना केली. त्याप्रसंगी पेट्रो केमिकल इंजिनिअर रुपेश सरोदे उपस्थित होते.
प्राथमिक विभागाचे निवृत्त शिक्षण उपसंचालक तथा सुप्रसिद्ध साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांचा शाल,श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन सपत्नीक गुरुमाऊली तथा ख्यातनाम कवयित्री उषाजी हिंगोणेकर यांचा पुस्तक भिशी प्रमुख विजय लुल्हे यांनी भावपूर्ण सत्कार केला .

गुरुपौर्णिमित
गुरुपौर्णिमेला गुरूंनी दिली अनोखी शिष्यदक्षणा
विनम्रपणे पुस्तक भिशीसाठी सुमारे १२०० रुपयांची शैक्षणिक, वाड़मयीन चरित्रात्मक तसेच बालकाव्यसंग्रह अशा १९ दर्जेदार पुस्तकांची ग्रंथभेट देऊन सुखद धक्का दिला. याप्रसंगी भिशीचे तंत्रस्नेही कलाशिक्षक सुनिल दाभाडे उपस्थित होते.
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड यांचा शाल श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन निवृत्त शिक्षण संचालक शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी ह.भ.प.मनोहर खोंडे,पुस्तक भिशी प्रमुख विजय लुल्हे, राजकुमार गवळी,देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष एस.एन . दाभाडे, शिक्षक एस.एस. बडगुजर,ग.स.सोसायटी संचालक मनोज माळी, अशोक माळी, भिवसन माळी मान्यवर उपस्थित होते.
निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांचाही सत्कार विजय लुल्हे यांनी केला.
आजकाल शिक्षकांना सामाजिक प्रतिष्ठा नाही अशी समाजात ओरड होत असते तेव्हा शिक्षकही समाजाचे घटक आहेत हे उत्तरदायित्व नैतिकदृष्ट्या स्विकारणे शिक्ष आद्य कर्तव्य आहे. किंबहुना शिक्षकांचे सुपूत्र असल्याने ती जबाबदारी जन्मजात आहे या विशुद्ध निरपेक्ष भावनेने विजय लुल्हे यांनी राबवलेल्या या अनौपचारीक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .उपक्रमासाठी साहित्यिक चंद्रकांत भंडारी व डॉ. सुभाष महाले,मसापच्या जळगाव अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.शिरीष पाटील,डॉ.मिलिंद बागुल यांनी मार्गदशनपर प्रोत्साहन दिले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!