जायन्ट्स ग्रुप जळगाव तेजस्विनीचा पदग्रहण सोहळा संपन्न..

जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनीचा प्रथम पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

जळगाव शहरात जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनीचा प्रथम पदग्रहण सोहळा संपन्न झाला. फेडरेशन उपाध्यक्ष संगीता पाटील व वसुंधरा जायंटस सहेली भुसावळ अध्यक्षा महानंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाने अध्यक्षा मनीषा पाटील यांच्या प्रयत्नांनी तेजस्विनी ग्रुपची स्थापना करण्यात आली.

याप्रसंगी प्रथम बेल वाजवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. जायंटस वेलफेयर फाउंडेशनचे विश्व उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शपथ विधी करण्यात आला. यावेळी महापौर जयश्रीताई महाजन यांनी तेजस्विनी जायंटस कार्यकारिणी सदस्य म्हणून शपथ घेतली.

याप्रसंगी प्रमुख अतिथी आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, जायंटस स्पेशल कमिटी मेंबर इंजि किशोर कुमार मिश्रा फेडरेशन अध्यक्ष डॉ संतोषकुमार मिश्रा, जळगाव जायंटस माजी अध्यक्ष पी ई तात्या पाटील, समाजकल्याण अधिकारी भरत चौधरी, महाराष्ट्रातील पारंपारिक पीक वाणाचे प्रथम संशोधक प्राचार्य डॉ एच एम पाटील, भुसावळ वसुंधरा सहेली अध्यक्ष महानंदा पाटील, फेडरेशन उपाध्यक्ष संगीता पाटील उपस्थित होते. याप्रसंगी इंजि किशोरकुमार मिश्रा यांनी कार्यपद्धती विषयी मार्गदर्शन केले.

आमदार राजूमामा भोळे यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. डॉ संतोष कुमार मिश्रा यांनी जायंटसची ध्येय आणि उद्दिष्ट याबद्दल मार्गदर्शन केले. समाजकल्याण अधिकारी भरत चौधरी यांनी आपल्या वाढदिवसाप्रित्यर्थ पाच हजार रुपयांची देणगी दिली. याप्रसंगी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि संस्थापिका मनीषा पाटील यांनी जायंटस ग्रुपच्या करावयाच्या कामाबद्दल माहिती दिली.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीस शेगाव जायंटस उपाध्यक्ष प्रकाश झांबरे यांच्या सुमधुर स्वागत गीताने सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जायंटस फेडरेशन उपाध्यक्ष संगीता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती राणे व आभार प्रदर्शन विद्या पाटील यांनी केले. याप्रसंगी उपस्थित तेजस्विनी सहली ग्रुपच्या राजकमल पाटील तसेच वसुंधरा सहेली सदस्या व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सुमित्रा पाटील,डाॅ सारिका पाटील, ॲड सीमा जाधव,अनिता पाटील, भावना चव्हाण,योगिनी पाटील,माधुरी अत्तरदे,विभावरी पाटील, नुतन तासखेडकर, मनिषा सुर्यकांत पाटील,भारती कापडणे,आरती व्यास,किमया पाटील, मंगला पाटील, निशा चौधरी,, रेणुका हिंगु, इंदिरा जाधव स्मिता पाटील पुष्पा पाटील यांचा शपथ घेणार्‍या मध्ये समावेश आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!