महाराष्ट्र पर्यावरण सखीमंच जळगाव तालुका समितीचे दुसऱ्या टप्प्यातील वृक्षारोपण…

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी शैलेंद्र ठाकूर

वृक्ष संवर्धन काळाची गरज..

जळगाव- दिनांक 18 /7 /2021 रविवार रोजी महाराष्ट्र महिला पर्यावरण सखी मंच जळगाव तालुका येथील टीमने 20 रोपांचे ट्री गार्ड लावून वृक्षारोपण केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन व डॉ. पदमेश ठाकरे (दंतरोग तज्ञ) उपस्थित होते सोबत शैलेश शिरसाठ तसेच जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा पाटील , जळगाव तालुका अध्यक्ष मनीषा शैलेश शिरसाठ , सचिव रुद्राणी देवरे , उपाध्यक्ष डॉ. भावना चौधरी व अर्चना महाजन कार्याध्यक्ष वैशाली बाविस्कर , तालुक्यातील पर्यावरण सखी सुलोचना बाविस्कर , सुनंदा कोळी, माया आमोदकर , कामिनी पाटील, वंदना पाटील, गौरी सपकाळे, पुनम पाटील, अर्चना गरुड, सुवर्णा पाटील, वैशाली पाटील , स्वप्नाली पाटील. उपस्थित होते .
याआधी 5 जून जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून वरद हॉस्पिटल जळगाव या ठिकाणी 25 झाडे लावून
कार्यक्रमाचा यशस्वी शुभारंभ करण्यात आला
झाडांमध्ये कडुनिंब, काशीद, कदंब ,करंज, शिसम, वड ,पिंपळ या सारख्या देशी वृक्षांचा समावेश करण्यात आला त्याचप्रमाणे पर्यावरण पूरक कापडी पिशव्यांचे वाटप देखील करण्यात आले होते . या कार्यक्रमासाठी राज्य समन्वयक नाना पाटील व महाराष्ट्र राज्य महिला पर्यावरण समितीच्या जिल्हाध्यक्ष नयना पाटील व उपाध्यक्ष छाया पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
सदरचा कार्यक्रम दांडेकर नगर पिंप्राळा परिसर जळगाव विनोद एकनाथ पाटील व पर्यावरण सखी कामनी पाटील यांच्या विशेष सहकार्याने त्यांच्या घराच्या समोरील ओपन स्पेस मध्ये घेण्यात आला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!