समता परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष पदी रावसाहेब जगताप.

दैनिक महाराष्ट्र सारथी भडगाव तालुका प्रतिनिधी रणजीत सोनवणे सर यांचेकडून.

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जिल्हा शाखा जळगाव च्या वतीने जिल्हा मेळाव्याचे आयोजन सरदार वल्लभ भाई पटेल सभागृह जळगाव येथे जिल्हा निमंत्रक रणजीत सोनवणे व त्यांच्या समवेत मनीषा देशमुख मनोज नन्नवरे या तिघ जिल्हा निमंत्रकांच्या नेतृत्वाखाली 14 नोव्हेंबर रोजी रविवारी करण्यात आले.

याप्रसंगी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील, डायटचे अधिव्याख्याता शैलेश पाटील, विस्तारअधिकारी रागिनी चव्हाण व शिक्षण विस्ताराधिकारी खलील शेख, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे समता परिषदेचे राज्य प्रदेशाध्यक्ष आप्पासो भरतजी शिरसाठ प्राथमिक विभागाचे माजी राज्य अध्यक्ष सूर्यकांतजी गरुड राज्य सदस्य डी.एम.मोतीराय,कास्ट्राईबाचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर,मा.अध्यक्ष बी.एन.पाटील महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा छाया बैसाने,भैय्यासाहेब सोनवणे,यांच्या उपस्थितीत सरदार वल्लभ भाई पटेल सभागृह जळगाव येथे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड चाळीसगाव संचलित न्यू इंग्लिश स्कूल शिरसगाव शाळेतील ज्येष्ठ शिक्षक रावसाहेब जगताप यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर शिक्षक,शिक्षिका सदर मेळाव्याला उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी त्यांचा सत्कार केला तसेच त्यांना समतेचे शिलेदार हे गौरवचिन्ह देऊन त्यांचा यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले. या त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. एम बी पाटील संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय देशमुख, संस्थेचे सेक्रेटरी वृक्षमित्र अरुण निकम, दुय्यम चिटणीस संजय पाटील शाळेचे मुख्याध्यापक बी एल ठाकरे पर्यवेक्षक राजू रणदिवे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेतील व तालुक्यातील प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील त्याचे अभिनंदन केले आहे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!