शिवपुर कन्हाळे येथे वसुबारस निमित्त गोपूजन ..

भुसावळ प्रतिनिधी —

शिवपुर कन्हाळे तालुका भुसावळ येथे वसुबारस निमित्त गो पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला . शिवपुर कन्हाळे येथील समाज सेविका तथा ग्रामपंचायत सदस्या सौ गिताबाई रायसिंग पाटील यांनी आपल्या घरी असलेल्या गोमातेचे पूजन मोठ्या भक्तिभावाने केले. माजी ग्रामपंचायत सदस्या सौ गिताबाई पाटील यांनी सांगितले की असे म्हटले जाते की समुद्र मंथनातून जी चौदा रत्ने निघाली त्यातील एक रत्न म्हणजे ‘कामधेनु’ ती शेतकऱ्यांची माता म्हणून गाय आणि वासरू यांची वसुबारस म्हणून वसुबारस या दिवशी पूजा केली जाते. पुरातन ग्रंथांमध्ये गो पालनाचे महत्व विशद केले आहे . गो पालनाची प्रेरणा मला माझे सासरे स्वर्गीय माणिकराव पाटील यांच्याकडून मिळाली . कोटी देवता गोमातेत सामावलेल्या आहेत . अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक अन्नदाता शेतकरी राजाला संजीवनी देणारी माता म्हणजे ” कामधेनु “शेतकऱ्याच्या घरात धनधान्याची बरसात दिवाळी आधी झालेली असते आणि दीपावली हा सण वसुबारस पासून सुरु होतो या दिवशी गो पूजनाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे . पूर्वी आमच्या कडे गाईंची संख्या खूप होती मोठा परिवार यांची दूध तूप त्याची सोय त्यामधूनच होत असे शिवाय शेती साठी शेणखात म्हणून घरचेच वापरले जाते त्याचा फायदा शेती उत्पादन वाढीत होते . आमच्या गावा जवळ असणारी माळरानाची जमीन गो संवर्धनासाठी उपयुक्त आहे . म्हणून गावात गाईंची संख्या पंचक्रोशीतील इतर गावांत पेक्षा मोठ्या संख्येने आहे. शिवाय आमच्या कडे जी बैल जोडी आहे ती आमच्या घरच्याच गाईंची आहे .शेती कसण्यासाठी त्या बैल जोडी चा आम्हाला मोठा फायदा होतो . याआधी मामा भाच्यांची एक बैल जोडी आमच्याकडे होती एवढ्या जास्त संख्येने गाई आमच्याकडे होत्या. अशाप्रकारे आमच्यासाठी जीवन दायनी गोमातेची पूजा करून तिच्या ऋणातून उतराई होण्यासाठी वसुबारस दिवस धर्म ग्रंथांनी राखून ठेवला आहे ही आनंदाचीच बाब आहे . हि संस्कृती टिकून ठेवणे ही आमची जबाबदारी आहे असे विचार व्यक्त केले . याप्रसंगी त्यांचे पती श्री रायसिंग पाटील ,श्री ठणसिंग पाटील,सौ निर्मला ठणसिंग पाटील, सौ ललिता प्रतापसिंग पाटील ,कु दीपाली प्रतापसिंग पाटील,श्री प्रतापसिंगव माणिक पाटील, श्री आनंदा माणिक पाटील , सौ भारती आनंदा पाटील, रंजीत सिंग पाटील, विजयसिंग रायसिंग पाटील, अमरसिंग ठाणसिंग पाटील ,अर्जुन आनंदा पाटील ,हिरासिंग आनंदा पाटील , विशाल प्रताप सिंग पाटील, लक्ष्मीकांत ठणसिंग पाटील, दुर्गासिंग पाटील ,वीरेंद्र ठाणसिंग पाटील ,परिवारातील इतर सदस्य बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते .सर्वांनी गोमातेची पूजा करून गोमातेचे दर्शन घेतले. शिवपुर कन्हाळे गावात इतरही घरोघरी हा गो पूजनाचा कार्यक्रम पहावयास मिळाला .ग्रामीण भागात या गावी अजूनही गोधन टिकून असल्यामुळे या वसुबारस सणाला शिवपुर कान्हाळे येथे आनंदी वातावरण निर्माण झाले होते..

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!