पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलची नीट परीक्षे मध्ये गरुड झेप….

चोपडा प्रतिनिधी – ( डॉ. सतिश भदाणे mob- 9975595887 )

नुकताच जाहीर झालेल्या नीट मेडिकल परीक्षेच्या निकालामध्ये चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. एकूण सोळा लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. वरद योगेश काबरा इयत्ता बारावी या विद्यार्थ्याने ७२० पैकी ६९१ गुण मिळवून राष्ट्रीय पातळीवर ३७६ वा क्रमांक मिळवला. तसेच ओम रामलाल जैन या विद्यार्थ्याने ६२६ गुण मिळवून ९२४५ वा क्रमांक राष्ट्रीय पातळीवर मिळवला.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, संचालक तथा रोटरी क्लब अध्यक्ष पंकज बोरोले, संचालक अविनाश राणे, एम. व्ही. पाटील मुख्याध्यापक पंकज प्राथमिक विद्यालय, व्ही. आर .पाटील मुख्याध्यापक पंकज माध्यमिक विद्यालय, डॉ.महादेव वाघमोडे प्राचार्य पंकज महाविद्यालय, सौ निता पाटील मुख्याध्यापिका पंकज इंग्लिश मीडियम स्कूल, पालक योगेश काबरा, सौ शिल्पा काबरा, रामलाल जैन, सौ अर्चना जैन, प्राचार्य मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीत वरद व ओम यांचा भव्य सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांनी वरद व ओम यांस भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व आपल्या जिल्ह्याचे, शाळेचे व पालकांचे नाव मोठे करण्यास कानमंत्र दिला. वैद्यकीय क्षेत्रात येऊन गोरगरीबांसाठी योगदान करावे असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
सदर विद्यार्थ्याना शिक्षक कृष्ण कुमार शुक्ला, के. पी. पाटील, चंद्रकांत पाटील, निलेश पाटील, इब्राहिम तडवी, सौ धनश्री पाटील , प्राचार्य मिलिंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!