स्थलांतरीत बेरोजगारांच्या जीवनातील अविचलीत अल्पसंतुष्टता हेच चिरंतन दिवाळी पर्व…

[ भारतरत्न डॉ .कलाम पुस्तक भिशीतर्फे उतारकरुंना फराळ वाटप करून उत्तर दिवाळी साजरी ]

जळगाव- ” स्थलांतरीत बेरोजगारांच्या जीवनातील अविचलीत अल्पसंतुष्टता हेच चिरंतन दिवाळी पर्व ” असे मार्मिक जीवनभाष्य निवृत्त जळगाव डायट प्राचार्य तथा केशव स्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड यांनी केले.क्रांतीसूर्य जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनाच्या औचित्याने भारतरत्न डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम पुस्तक भिशी आयोजित उत्तर दिवाळी फराळ वाटप जळगाव भुसावळ महामार्गावरील कालीका माता मंदिरा जवळील स्थलांतरीत बेरोजगारांच्या वस्तीत बालकांसह ज्येष्ठ महिला पुरुषांना दिवाळी फराळ रविवार दि . २८ नोव्हेंबर २०२१ रोजी वाटप करण्यात आला . त्याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना गायकवाड बोलत होते.केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी साप्ताहिक अनमोल मत चे प्रमुख संपादक शैलेंद्र ठाकूर, लेवा आयकॉन पुरस्कार प्राप्त दिव्यांग नृत्यांगना मानसी पाटील ,निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर , पुस्तक भिशीचे जिल्हा प्रमुख विजय लुल्हे, महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा उपक्रम प्रमुख शिरीष चौधरी यांच्या हस्ते आबालवृद्धांना दिवाळी फराळात शेवचिवडा, शंकरपाळे, चकल्या यांचे सन्मानपूर्वक वाटप करोना निर्बंधातील स्वच्छता व आरोग्य विषयक निर्बंध पाळून उत्साहात करण्यात आले .निर्भयता व समायोजनशीलता याच जन्मतः परेश्वराने दिलेल्या लसींमुळेच कोरोना काळात मृत्यू गरीबांपासून चारहात लांब राहीला असे मार्मिक प्रतिपादन पत्रकार शैलेंद्र ठाकूर यांनी काढले . निवृत्त उपशिक्षणाधिकारी नेतकर व संयोजक विजय लुल्हे यांनीही मनोगत मांडले .

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुदाम बडगुजर ,भागवत ठाकूर,महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी यांच्यासह निवृत्त केंद्रप्रमुख शिवाजी भैय्या पाटील, अंनिस कार्यकर्ते विश्वजीत चौधरी व जितेंद्र धनगर ,प्रभारी केंद्रप्रमुख अरुण वांद्रे, अ .भा . अंनिसचे महेश शिंपी सर, मुख्याध्यापक हेमंत धांडे,अभियंता मिलिंद काळे व प्रमोद माळी, निबंधकार वर्षा अहिरराव, विशाखा देशमुख , गझलकारा आशा साळुंके, ज्योती राणे, चित्रकार सुनिल दाभाडे यांनी आर्थिक सहकार्य केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!