नाहाटा महाविद्यालयात रासेयो युनिट द्वारे स्वच्छता अभियानास प्रारंभ…

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ प्रतिनिधी नाना पाटील.

कला, विज्ञान आणि पी.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिट द्वारे स्वच्छता पंधरवडा साजरा

भुसावळ :येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिट द्वारे दिनांक 1 ऑगस्ट पासून स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. त्यानुसार आज दिनांक 8 ऑगस्ट 2021 रोजी परिसरात विविध भागात स्वच्छता केली. तसेच विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सामाजिक स्वच्छतेचे देखील धडे दिले जात आहेत. त्याचबरोबर जागतिक अवयवदान दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, व्याख्यानमाला व 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
आज रविवार दिनांक 8 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय सेवा योजना चा एक्काद्वारे महाविद्यालयातील परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच जागतिक अवयवदाना चे निमित्त साधून शनिवार दिनांक 7 ऑगस्ट 2021 रोजी रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
आज रविवार रोजी महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.ममताबेन पाटील यांनी जागतिक अवयवदान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अशा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये रक्तदानाचे महत्त्व वाढले आहे. तसेच अवयवदाना साठी स्वेच्छेने तयार होणारी आंतरिक प्रेरणा असली पाहिजे. कारण आपल्या अवयवदानाणे दुसऱ्या व्यक्तीचे प्राण वाचणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वयंप्रेरणेने या अभियानात सहभाग घेतला पाहिजे. त्यासाठी शासनाच्या www.notto.gov.in या संकेतस्थळावर आपले नाव नोंदणी केली पाहिजे.तसेच समाजातील विविध घटकांमध्ये याबाबत जनजागृती केली पाहिजे यासंदर्भात मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.आर. एस. नाडेकर यांनी स्वच्छता पंधरवडा व त्यात केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजनाबाबत मार्गदर्शन केले. स्पर्धांमध्य विद्यार्थ्यांचे स्वयंप्रेरणेने सहभाग घेणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. स्वच्छता पंधरवडा च्या माध्यमातून बाह्य स्वच्छतेच्या इतकेच व्यक्तीच्या अंतर्गत विचारांची स्वच्छता देखील महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तनिष भोसले यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन स्वयंसेवक तारकेश्वरी यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी रासेयोचे विविध स्वयंसेवक उपस्थित होते. सागर सोनवणे, सागर पाटील, वैभव पाटील, आकाश बोदडे, स्वप्नील डोळसे, एकता बजाज, गायत्री बजाज, संजना दुधानी, कल्याणी यांसारखे विविध विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ.एम. व्ही. वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य ए. डी. गोस्वामी व डॉ. एन. इ. भंगाळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!