महामार्गाचे विद्रुपीकरण थांबवा जनतेची आर्त हाक….

भुसावळ (प्रतिनिधी)

जाहिरात ही चौसष्ट काला प्रकारसतील एक कला आहे. ग्राहकांना विविध प्रकारचे उत्पादने,सेवा पुरवठा करण्यासाठी ,इतरांपेक्षा आपली वस्तू व सेवा कशी दर्जेदार आहे याच बरोबर ती कमी किमतीत ग्राहकांना उपयुक्त कशी आहे या साठी उत्पादक जाहिरातीचा आधार घेतो. पण अशी जाहिरात प्रसिद्ध करताना आचार संहिता नगरपालिका क्षेत्रात लागू असते छोटी भिंतीपत्रके मोठी पोस्टर्स या मुळे शहरात ठीक ठिकाणी विद्रुपीकरण , अतिक्रमण झालेले दिसून येते नाहाटा चौफुली जवळील उड्डाणपुलाखाली चार पिलरवर आकर्षक रंगात अनेक जाहिराती चीपकवलेल्या होत्या याचे विद्रुपीकरण थांबावे अशी जनतेची मागणी होती .महामार्ग प्राधिकरण कर्मचारी यांनी आशा विद्रुपीकरण केलेल्या जाहिरातदारांशी संपर्क साधून आमच्या हद्दीत असे प्रकार करण्यात येऊ नये महामार्ग प्राधिकरण कर्मचारी यांनी चिटकवलेले पोस्टर्स काढून टाकले. यानंतर असे बेकायदेशीर प्रकार झाले तर योग्य ती कार्यवाही तसेच दंड केला जाईल .महामार्ग प्राधिकरण पर्यवेक्षक यांनी दखल घेत विद्रुपीकरण थांबवले, जाहिरातदारांना समज दिली .उड्डाणपुलाचे काम जोमाने पूर्णत्वास येत आहे . यासाठी आजूबाजूला अतिक्रमण करू नये अशा सूचना दिल्या . लवकरच उड्डाणपुलालाच्या चौफेर आकर्षक सुशोभिकरण करावे अशी मागणी नागरिकांकडून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिका अधिकार यांचे कडे होऊ लागली आहे .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!