भुसावल तालुक्यामधील पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या तळवेल उपकेंद्र येथे आरोग्य सेवा सत्रात न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन ‘ (PCV) या अत्यंत गंभीर आजारावरील लसीकरण सेवा सत्राचा शुभारंभ….

PCV (न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन ‘) या आजारावरील लसीकरण सेवा सत्राचे आरोग्य उपकेंद्र तळवेल( प्रा आ केंद्र पिंपळगाव,भूसावळ) येथे जिल्हा पंचायत समिती सदस्य श्री विजय सुरवाडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ प्रतिनिधी राजेंद्र ठाकूर

दिनांक 13 रोजी जळगाव जिल्ह्यातील भुसावल तालुक्यामधील पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या तळवेल उपकेंद्र येथे आरोग्य सेवा सत्रात न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन ‘ (PCV) या अत्यंत गंभीर आजारावरील लसीकरण सेवा सत्राचा शुभारंभ करण्यात आला,
” लहान मुलांमधील न्यूमोकोकल आजार आणि त्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी हे आरोग्य सेवा सत्र राबवण्यात येत आहे . २ वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये ‘ न्यूमोकोकल ‘ हा आजार होण्याचा धोका दिसून येतो . व, मुख्यतः १ वर्षाच्या आतील बालकांमध्ये तो धोका सर्वाधिक असल्याने न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीनचे लसीकरण करून बालकांचे पूर्णपणे संरक्षण केले जावे , हा या लसीकरण सत्राचा मुख्य उद्देश आहे .

या कार्यक्रमाचे उद्घाटन पं. स . सदस्य श्री विजय सुरवाड़े यांच्या हस्ते झाले त्या वेळी श्री नीलेश शिरसागर CHO व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तळवेल येथील आरोग्य सेविका श्रीमती मनिषा एम ठाकुर ,आ.सेवक श्री पांडूरंग अवचार आणि सौ वंदना पाटील, सुषमा खोंडे, अनिता आमोदकर, संघमित्रा तायडे, उज्वला राणे या आशा कार्यकर्त्यां , कमलबाई चौधरी आरोग्य सहायका व गावातील सर्व ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!