जागतिक तंबाखु विरोधी दिनाची ठिकठिकाणी पायमल्ली.!

आजही जागोजागी मुबलक प्रमाणात मिळतोय गुटखा, मावा…. कारवाई करणार कोण?

औरंगाबाद प्रतिनिधी –

जागतिक तंबाखु विरोधी दिन या निमित्ताने सरकार शासन दरबारी अनेक ऊपाययोजना करत नागरीकांना तंबाखू सेवन आरोग्यास हानीकारक असल्याचे सांगत जनजागृती नेहमी करत असते.मागील वर्षी देखील जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यानी जिल्हाधिकारी कार्यालयात पथनाटयाद्वारे तंबाखुविरोधी पथनाट्य्याद्वारे नागरीकांना संदेश देत जनजागृती करण्यात अग्रेसर दिसुन आले .परंतु शासन दरबारी एवढे जनजागृती करत असतांना देखील याची अंमलबजावणी कुठेच कशी पुर्ण होत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे .आजही औरंगाबाद शहरासह खेड्यापाड्यातील वाड्या वस्त्यांवर तंबाखु सेवन तसेच गुटखा विक्रीचे प्रमाण मोठया प्रमाणावर दिसुन येते.
प्रत्येक खेड्यापाड्यातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील नागरीक गुटखा सिगारेट मावा आदी तंबाखूजन्य
पदार्थाचे मोठया प्रमाणावर सेवन करताना आढळून येतात यावर अंकुश लावण्याचे फार गरज आहे.
आजही गावागावातील गल्लीबोळात
बाहेरील राज्यातुन या मादक तसेच नशीली गुटख्याचे आयात होत आहे तो ईतर राज्यातून महाराष्ट्रात येणारा गुटखा हा इथपर्यंत येईपर्यंत अन्न व औषध प्रशासन नेमके काय करत आहे असे नाराजीचे सुर निघत आहे.
गूटखा आपल्या राज्यात
का येतो याच्याकडे लक्ष देण्याची गरज दिसत आहे.
ग्रामिण भागात खुलेआम
गुटखा सहज मिळत असल्याने अल्पवयीन अनेक मुले या गुटख्याच्या सेवनाच्या आहारी गेलेले दिसत असुन कमी वयात गुटख्याच्या अमिषाला बळी पडत आहे.
कर्करोगासारख्या भयानक आजाराला सामोरे जावे लागणार याची त्याना जाणिव नसल्याने मृत्यूच्या दाढेत ओढत चालले आहे हे नक्की.सर्रास अवैध गुटख्याची विक्री
बिनधास्तपणे सुरु असुन यावर आता संबंधित विभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.अन्न व औषध प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी असल्याने ते जिल्ह्यात कुठे कुठे कारवाई करणार?

आपल्या नेहमीच कारवाया सुरु असतात.अन्न औषध व पोलीस प्रशासन संयुक्त कारवाई करतात मागील वर्षांपासून तर आतापर्यंत 55 ठिकाणी धाडी टाकून कारवाया केलेल्या आहेत.जर एखाद्या ठिकाणी बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असेल आणि त्याची माहिती आम्हाला दिल्यास आम्ही कारवाई करु.आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे पोलीस आणि आम्ही संयुक्त कारवाई करतो.आरोग्य विभाग,पोलीस यंत्रना आणि अन्न व औषध प्रशासन दर महिन्याला मोहिम राबवुन जनजागृती करतो.-

अ.अ.मैत्रे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन औरंगाबाद
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!