पत्नी पीडित संघटनेने केले शूर्पणखा दहन, महिलांप्रमाणे पुरुषांना न्याय देण्याची मागणी

औरंगाबाद,

विजया दशमीच्या दिवशी सर्वत्र रावण दहन केले जाते मात्र करोडी येथील पत्नी पीडित पुरुष आश्रम येथे शूर्पणखा वृत्ती दहन करून महिलांमधील अपप्रवृत्तीचा निषेध व्यक्त करण्यात आला.

महिलांमधील वाईट वृत्ती जळून जाणे गरजेचे –

विजयादशमीच्या म्हणजेच दसर्‍याच्या दिवशी परंपरेनुसार रावणाच्या प्रतिमेचे दहन करून वाईट वृत्तीचे दहन होवो अशी मनोकामना व्यक्त केली जाते. रावण एक पुरुष असून रावणाची प्रतिमा तयार करून जाळल्याने जर पुरुषांची वाईट वृत्ती जळते तर नक्कीच महिलांमधील वाईट वृत्ती जळून जाणे देखील तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे रावण महापंडित असताना त्यांना जर समाज वाईट म्हणून दहन करत असेल तर रावणाच्या बहिणीच्या वाईट वृत्तीचे दहन होणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे दरवर्षी तिचे दहन केले जाते अशी माहिती पत्नी पीडित आश्रमाचे अध्यक्ष भारत फुलारी यांनी दिली.

महिलांप्रमाणे पुरुषांना देखील न्याय मिळावा –

आज आपण 21 साव्या शतकात जगत आहोत व ज्याप्रमाणे महिलांवर अन्याय होतात. त्याप्रमाणे पुरुषांवर देखील अन्याय अत्याचार होतात हे लक्षात घेणे गरजेचे आहे. महिलांवर अत्याचार, अन्याय झाल्यास त्याचा चारही बाजूने उदो उदो केल्या जातो, महिलांसाठी महिला आयोग आहे, महिलांवर अत्याचार झाल्यास बहुतांश पोलीस देखील केवळ महिलांची बाजू ऐकून घेतात, महिलांच्या बाजूने कायदे आहेत, सरकार आहे! न्याय व्यवस्था देखील केवळ महिला धार्जिनी बनत चालली आहे. महिलांप्रमाणे पुरुषांना देखील न्याय मिळावा अशी मागणी पत्नी पीडित संघटनेने केली आहे.

पत्नी पीडित संघटनेच्या मागण्या…..

ः पुरुषांसाठी वेगळा पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे.

ः प्रत्येक पोलीस ठाणेत पुरुष सुरक्षा समिती स्थापन झाली पाहिजे.

ः पुरुषांच्या रक्षणासाठी पुरुषांच्या बाजूने देखील कायदे बनले पाहिजे.

ः घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचे संरक्षण अधिनियम लागू झाला पाहिजे.

ः पोलिसांना पुरुषांची बाजू योग्यरितीने ऐकून घेण्याची सह्ुद्धी दिली पाहिजे.

ः न्याय व्यवस्थेला सह्ुद्धी दिली पाहिजे.

ः महिलामध्ये असणारी वाईटवृत्ती, कुबुद्धी व सूड बुध्दी जाऊन, त्यांना सह्ुद्धी मिळावी यासाठी आम्ही सालाबादाप्रमाणे विजयादशमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर शूर्पणखा वृत्ती दहन केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!