भारतीय सुवर्णकार समाजाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षांचा सत्कार समारंभ संपन्न…

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील

जय श्री नरहरी महाराज वरणगाव सुवर्णकार समाज महिला मंडळातर्फे महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष अर्चना ईश्वर सोनार यांचा सत्कार संपन्न करण्यात आला.

वरणगाव- जय श्री नरहरी महाराज वरणगाव सुवर्णकार समाज महिला मंडळातर्फे श्री .श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष अर्चना ईश्वर सोनार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता वरणगावच्या सुवर्णकार समाज महिला मंडळातर्फे मिळालेल्या मानसन्मान प्रेमामुळे अर्चना सोनार यांनी मनस्वी आभार व्यक्त केले आहे
औरंगाबाद येथील माहेर असलेल्या वरणगाव शहरातील पवार कुटुंबियांच्या त्या लाडक्या सुनबाई आहेत
अर्चना सोनार यांचे शिक्षण हे सायन्स पदवीधर झालेले असून व इतर अनेक कोर्सेस करत आपल्यातील असलेली कुशाग्र बुद्धिमत्तेचे दर्शन देत सरस्वती देवीची जणू कृपादृष्टी होत आशीर्वाद हा त्यांना मिळालेला आहे
अर्चना सोनार यांच्याकडे जवळजवळ सात प्रकारचे विविध संस्थेचे पद भूषवत त्या संचालिका व अध्यक्ष सुद्धा आहेत
व तसेच आदर्श योग शिक्षक पुरस्कार व सोनाली गुणगौरव मंच तर्फे पुरस्कार प्राप्त झाले आहेत
.

इतर सर्व समाज महिला भगिनी बरोबर स्नेह संबंधाने ईद-ए-मिलाद कार्यक्रम शिवजयंती साजरी करणे आपद्ग्रस्तांसाठी सामाजिक कार्यात सहभाग कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत कोविड ग्रस्त भागात गरजूंना मदत लसीकरणासाठी प्रचार-प्रसार करणे रक्तदान करणे योग्य मार्गदर्शक वृक्षारोपण सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्य सहभाग ज्ञानाई महिला भजनी मंडळाच्या वतीने भजनाचे कार्यक्रम अध्यात्मिक गजानन ग्रुपच्या वतीने लहान मुलांवर बाल संस्कार केंद्र भगवद्गीता शिकवणे

अर्चना सोनार या पुणे येथील चिंचवड येथे आपल्या परिवार सांभाळत सामाजिक कार्यात अग्रेसर राहत आपल्या कामाचा ठसा उमटवत दबदबा हा निर्माण केलेला असून तमाम महिला सुवर्णकार समाजासाठी आज त्या एक आदर्श असून
अर्चना सोनार सुवर्णकार समाजासाठी एक अनमोल रत्न रुपीच आहेत
.

✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
प्रशांत पाटील
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
95940 47437

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!