क्रिकेटर युवराज सिंहच्या फाउंडेशनकडून तेलंगानातील रुग्णालयाला 120 खाट

हैद्राबाद,28जुलै

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि दोन वेळा विश्व कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य राहिलेल्या युवराज सिंहची संस्था यूवीकॅन फाउंडेशनने तेलंगानातील निजामाबादच्या सरकारी वैद्यकिय महाविद्यालय आणि जनरल रुग्णालयात 120 क्रिटिकल केयर यूनिट (सीसीयू) बेड स्थापित केले आहे.

यूवीकॅन फाउंडेशनला यासाठी एसेंचरकडून आर्थिक मदत मिळाली आहे. यूवीकॅन फाउंडेशनने रुग्णालयाला अनेक प्रकारचे वैद्यकिय उपकरणे उपलब्ध केली असून यात बीपॅप मशीन, आयसीयू व्हेटिलेटर, पेंशेंट मॉनिटर, क्रॅश कार्ट आणि ऑक्सीजन सिलेंडर सामिल आहेत.

युवराजने एक निवेदन प्रसिध्द करत म्हटले की आपल्या सर्वाेंना कोविड-19च्या दुसर्‍या लाटे दरम्यान खूप नुकसान झेलावे लागले आहे. आपण आपल्या प्रियजणाना गमविले आहे. आपल्याला ऑक्सीजन, आयसीयू बेड आणि अन्य महत्वपूर्ण सुविधांसाठीही संघर्ष करावा लागला आहे.

युवराजने निवेदनात पुढे म्हटले की अशा प्रकारच्या अनिश्चित संकट आणि अनेकांचे प्राण गमविण्या बरोबरच मला स्वत:ला एक व्यक्तीगत नुकसानातून जावे लागले. त्यानंतर मी हे निचित केले की मला या घातक विषाणू विरुध्दच्या लढाईमध्ये आमच्या डॉक्टर्स आणि फ्रंटलाईन कार्यकर्त्यांना समर्थन केले पाहिजे. आमचा पुढकार मिशन 1000 बेडच्या माध्यामतून आम्ही लोक आपल्या देशातील वर्तमान क्षमतांना वाढविण्यासाठी देशभरातील रुग्णालयांमध्ये कोविड-19 क्रिटिकल केअर सुविधा स्थापित करत आहोत.

युवराज सिंहने बुधवारी तेलंगानाचे गृहमंत्री महमूद अली, असेंचरचे प्रतिनिधी आणि रुग्णालयातील काही प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये या सुविधेचे उद्घाटन केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!