’अनपड महिला पत्रकार’ हरभजन सिंग ने पाक च्या पत्रकाराला दिले चोख प्रत्युत्तर

दुबई,

टी20 वर्ल्ड कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच झाल्यापासून हरभजन सिंग आणि मोहम्मद आमिर यांच्यात वाद सुरू आहे. या वादात आता आणखी एका व्यक्तीची भर पडली आहे. पाकिस्तानी महिला पत्रकार इकरा नसीर यांनी खोचक टिवट करत हरभजन सिंगला डिवचण्याचा प्रयत्न केला. पण, हरभजन सिंगनेदेखील अनपड महिला पत्रकार म्हणत इकरा नसीर यांना चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानी महिला पत्रकार इकरा नसीर यांनी हरभजन सिंग आणि शाहिद आफ्रिदी या वादात उडी घेत असल्याचा व्हिडीओ टिवट केला आहे. या व्हिडीओमध्ये हरभजन सिंग गोलंदाजी करताना दिसत आहे आणि शाहिद आफ्रिदी फलंदाजी करताना दिसत आहे. आफ्रिदीने चार चेंडूत चार षटकार ठोकले. यानंतर त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, फहरभजन सिंग तुमच्या आठवी साठी. चार चेंडूत चार षटकार आणि हो कसोटी सामना.

याला प्रत्युत्तर म्हणून हरभजन सिंगने एक व्हिडीओ टिवट केला आहे. ज्यामध्ये हरभजन सिंग आफ्रिदीच्या चेंडूंवर गगनचुंबी षटकार मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत भज्जी अनपड महिला पत्रकार हे तुमच्यासाठी अशी कॅप्शन दिली आहे.

टी20 वर्ल्ड कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच झाल्यापासून हरभजन सिंग आणि मोहम्मद आमिर यांच्यात वाद सुरू आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये टिवटरवर जोरदार वाद झाला. त्या वादामध्ये आमिरनं सभ्य भाषेची मर्यादा ओलांडली. त्यानंतर हरभजननं व्हिडीओ शेअर करत पाकिस्तानच्या बॉलरची कानउघाडणी केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!