गोळाफेकमध्ये अरविंद 7व्या स्थानावर

टोकियो,

भारतीय अ‍ॅथलिट अरविंद टोकियो पॅराऑॅलिम्पिक स्पर्धेत पुरूष गोळाफेक एफ 35 स्पर्धेत सातव्या स्थानावर राहिला. त्याला विनापदक परतावे लागले.

पहिलेच पॅराऑॅलिम्पिक स्पर्धा खेळत असलेला 28 वर्षीय अरविंद, आठ खेळाडूंच्या फायनलमध्ये सर्वश्रेष्ठ 13.48 मीटर लांब गोळा फेकू शकला. या स्पर्धेत उज्बेकिस्तानच्या खुसनिद्दीन नोरबेकोव याने सुवर्ण पदक जिंकले. त्याने 16.13 मीटरचा थ-ो केला. तर अर्जेंर्टिनाचा इमॅनुअल उरा याने 15.90 मीटरच्या थ-ो सह रौप्य पदकाला गवसणी घातली. चीनचा फु जिनहान 15.41 मीटरच्या थ-ोसह कास्य पदकाचा मानकरी ठरला.

जगातील अव्वल पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत याने टोकियो पॅराऑॅलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठली. त्याने पुरूष एकेरीच्या ग-ुप ए मधील दुसर्‍या सामन्यात युक्रेनच्या ओलोक्सांद्रे चिरकोव याचा पराभव केला. भगतसोबत भारताचे इतर पॅरा बॅडमिंटनपटू सुहास यतिराज, तरुण ढिल्लो आणि कृष्णा नागर यांनी पुरूष एकेरीत विजयी सुरूवात केली.

भारताचा राहुल जाखर टोकियो पॅराऑॅलिम्पिकमध्ये पी3 मिक्स्ड 25 मीटर पिस्तूल एसएच 1 इव्हेंटच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. तो पात्रता फेरीत दुसर्‍या स्थानावर राहिला. भारताचा दुसरा पॅरा नेमबाज आकाश याला अंतिम फेरी गाठता आली नाही. त्याला 20व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!