भाऊ सर्वांना शुभेच्छा सांग! पंतप्रधान मोदींचा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतला फोन

टोकियो

5 ऑगस्ट

भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये इतिहास रचला. कर्णधार मनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळणार्‍या भारतीय संघाने जर्मनीचा 5-4 ने पराभव करत कास्य पदक जिंकलं. यासह भारतीय संघाने 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. देशभरात या विजयानंतर जल्लोष साजरा केला जात आहे. या दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कर्णधार मनप्रीत सिंग याच्याशी फोनवर बातचित केली. वाचा मोदी आणि खेळाडूंमधील चर्चा…

मनप्रीत सिंग : नमस्कार सर

पंतप्रधान मोदी : मनप्रीत जी, खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आणि तुमच्या संघाने चांगलं काम केलं आहे.

मनप्रीत सिंग : थॅक्यू सर.

पंतप्रधान मोदी : संपूर्ण देश जल्लोष साजरा करत आहे.

मनप्रीत सिंग : थॅक्यू सर. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आमच्या सोबत होते.

पंतप्रधान मोदी : त्या दिवशी तुझ्या आवाजात थोडीशी वेगळी होती. आज एकदम बरोबर आहे.

मनप्रीत सिंग : तुमचं मोटिवेशन आमच्या संघासाठी महत्वाचं ठरलं

पंतप्रधान मोदी : तुम्हा सर्वाचे कष्ट काम करत आहे. तुमच्या प्रशिक्षकांनी देखील यासाठी खूप मेहनत घेतली आहे. माझ्याकडून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दे भावा. 15 ऑॅगस्ट रोजी आपण सगळे जण भेटू यासाठी मी सर्वांना आमंत्रण दिलं आहे. तुझे प्रशिक्षक तुझ्यासोबत आहेत का?

प्रशिक्षक ग-ाहम रीड : आम्हाला आशा आहे की, आम्ही तुम्हाला प्राउड फिल केलं. सेमीफायनल नंतर तुम्ही आमच्याशी केलेली चर्चा आणि तुमचे शब्द आमच्यासाठी प्रेरणादायी ठरले.

पंतप्रधान मोदी : शुभेच्छा शुभेच्छा. तुम्ही तर इतिहास रचलात. माझ्याकडे शब्द नाहीत. तुमच्या कठोर परिश्रमाचे हे फळ आहे.

मनप्रीत सामना संपल्यानंतर काय म्हणाला…

सामना संपल्यानंतर मनप्रीतने माध्यमाशी बातचित केली. यात तो म्हणाला की, या ऑॅलिम्पिकसाठी खेळाडूंनी खूप परिश्रम केलं होतं. ते पदकास डिजर्व करतात. हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. श्रीजेशने सांगितलं होतं, हा प्रेशरवाला सामना आहे. आपण एन्जॉय करायला हवं आणि नॅचरल खेळ करायला हवं. जर आम्ही पदकाचा विचार करत बसलो असतो तर परफॉर्म करू शकलो नसतो. आम्ही फक्त आमचे बेस्ट दिलं आणि अखेरपर्यंत हार मानली नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!