“स्वातंत्र्य दिना निमित्त रोड स्केटिंगचे आयोजन …..! “

रावेर प्रतिनिधी:-प्रदीप महाराज

सरदार जी. जी. हायस्कूलचे विद्यार्थी व अंबिका स्केटिंग क्लबचे खेळाडू यश महाजन ,लोकेश महाजन, उज्वल महाजन, यश वाणी या चार खेळाडूंनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्त रोड स्केटिंग करत तिरंगी ध्वजाला मानवंदना दिली.
या प्रसंगी सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अशोकशेठ वाणी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.कन्हैयालालशेठ अग्रवाल यांनी व्हिसल वाजवून व संस्थेचे उपाध्यक्ष श्री.अशोकशेठ वाणी यांच्या हस्ते झेंडा फडकवून स्केटिंग रॅलीला सुरुवात झाली.व पोलिस स्टेशन पर्यंत जावून तेथून वळसा घेवून सर्व स्केटिंगचे खेळाडू पुनःश्च डॉ.बाबासाहेब आबेडकर पुतळ्याच्या आवारात रॅलीचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला संस्थाचालक श्री शैलेंद्र देशमुख,श्री शितलभाऊ वाणी ,जिल्हा उपाध्यक्ष भा.ज.पा.श्री.पद्माकरभाऊ महाजन, काँग्रेस ता.अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,
भा.ज.पा.ता.अध्यक्ष श्री.राजन लासुरकर, श्री.अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री.भास्कर महाजन,अंबिका व्यायाम शाळेचे उपाध्यक्ष श्री रवींद्र महाजन,नगरसेवक यशवंत दलाल, सरदार जी.जी. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.शिरीष वाणी सर, उपमुख्याध्यापक श्री.टी.बी.महाजन सर,पर्यवेक्षक श्री.ई.जे.महाजन सर,यशवंत हायस्कूलचे श्री.बी.डी.पाटील सर, सरदार जी जी हायस्कूल प्राथमिकचे व्यवस्थापक श्री.अभिजीत लोणारी सर, श्री रवींद्र पाटील, अजिंक्य वाणी, जयेश बिरपन,रविंद्र महाजन,दिलीप महाजन व शाळेचे माजी विद्यार्थी तसेच सरदार जी.जी.स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम हा क्रीडा शिक्षक श्री.जे.के.पाटील सर, युवराज माळी सर, अजय महाजन सर, किरण महाजन सर व प्रशिक्षक बॉबी गांगवे, कुणाल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!