ऐनपुर येथे किरकोळ कारणावरून मारहाण व दगडफेक… गावात तणावाचे वातावरण..

दैनिक महाराष्ट्र सारथी ऐनपुर प्रतिनिधी :- विजय एस अवसरमल-

रावेर -ऐनपुर येथे किरकोळ कारणावरून दोन गटात दगडफेक झाली यात आठ जण जखमी झाले आहे रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
याबाबत सविस्तर माहिती अशी की ऐनपुर येथे मुस्लीम वाड्यात हैदर अली सैयद अली याने त्याच्या घरासमोर गोड भात ( न्याज ) चा कार्यक्रम ठेवला होता त्याच्या गोड भात ची चुल आमच्या घरासमोर का लावली यांचा राग शेख रशीद शेख अजीज यांना येऊन त्यांच्या सोबत असलेल्या १८ ते २० लोकांनी काठी लोखंडी रॉड दगड विटा मारुन हैदर अली सैयद अली व त्यांचे ७ ते ८ साथीदार यांना मारुन गंभीर दुखापत केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली या कारणांमुळे शनिवारी ११ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ८.३० वाजेच्या सुमारास मुस्लीम वाड्यात दोन गटात वाद होऊन दगडफेक करण्यात आली या दगडफेकीत आठ जण जखमी झाले असून यातील दोन गंभीर जखमी झाले आहेत यात सैयद रहेमत सैयद शादत ,सैयद शौकत , अकीलाबी शेख आबीद जुबेर खान आलमगीर खान ,शरीफ खान हैदर आली सैयद आली ,सैयद जलील सैयद सलीम जखमी झाले आहेत
.

जखमींना उपचारासाठी जळगाव येथील शासकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच निंभोरा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील उन्नवणे साहेब आपला फौजफाटा घेऊन ऐनपुर येथे दाखल झाले व येथील परीस्थिती आटोक्यात आणली या बाबत निंभोरा पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३२४,३२६,३२३,१४९,३३६, ३३७,५०४,५०६ १४३,१४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना अटक करण्यात येत असून आरोपी फरार आहेत या घटनेचा तपास निंभोरा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील उन्नवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय काशिनाथ कोळंबे साहेब हवालदार विकास कोल्हे ज्ञानेश्वर चौधरी, नितीन पाटील, स्वप्नील पाटील,इश्वर चौहान हे करीत आहे गावात शांतता आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!