पुणे : बालेवाडीत बांधकांम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला; 12 जण जखमी

पुणे

पुण्यातील बालेवाडी परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. बालेवाडीतील पाटील नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळला आहे. या दुर्घटनेत 12 जण जखमी झाल्याची आणि अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अजून काही जण ढिगार्‍याच्या खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इमारतीचा स्लॅब कोसळला

6 जणांची प्रकृती गंभीर –

ही दुघटना रात्री 11 ते 12 च्या दरम्यान घडली असून दुर्घटनेची माहिती मिळताच पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या 6 फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच 12 जणांना जखमी अवस्थेत दवाखान्यात दाखल करण्यात आलं होते. अजून काही लोक ढिगार्‍याखाली अडकल्याच्या भीतीने मदतकार्य सुरू आहे. जखमी झालेल्यापैकी 6 जणांची प्रकृती ही गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!