बापलेकीच्या नात्याला काळीमा! ईल व्हिडीओ दाखवून बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

परभणी,

परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर ईल व्हिडीओ दाखवून नराधम बापाने अत्याचार केलाय. आरोपी नराधम बापास पोलिसांनी बेड्या ठोकल्या असुन या घटनेने पाथरीसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील बेकार मोहल्ला येथे राहणार्‍या नराधम बापाने 10 ऑगस्ट रोजी रात्री आपल्या 14 वर्षीय मुलीस ईल व्हिडीओ दाखवून तिच्यावर अत्याचार केला. एवढच नाही तर ही बाब जर आईला सांगितली तर तिला फिनाईल पाजुन जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे मुलगी अत्यंत भयभीत झाली होती. मात्र, दोन दिवसांनी या मुलीने आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. या घटनेनंतर आईने मुलीला घेऊन थेट पाथरी पोलीस ठाणे गाठले आणि नराधम बापाविरुद्ध तक्रार दिली. ज्यावरून पाथरी पोलीस ठाण्यात आरोप बापाविरुद्ध गु.र.नं. 3642021 कलम 376 (2)(फ) 354(ब) 506 भादवी पॉस्को 3, 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास हा पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे करत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!