दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपुर द्वारे आयोजित वेबिनारमध्ये “कर्नाटक फोकलोर” या विषयावर व्याख्यान

नवी दिल्ली 17 JUL 2021

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपुर द्वारे आयोजित वेबिनारच्या शृंखलेमध्ये शनिवार दिनांक 17 जुलै 2021 रोजी “कर्नाटक फोकलोर” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या ऑनलाईन वेबिनारमध्ये कर्नाटक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगन्नाथ हेब्बळे यांनी या विषयावर व्याख्यान दिले. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या युट्युब वाहिनीवर 159  हून अधिक प्रेक्षकांनी या ऑनलाईन कार्यक्रमाचा आनंद घेतला.

डॉ. जगन्नाथ हेब्बळे यांनी हे व्याख्यान देताना कर्नाटकची लोककला, लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोकगीत तसेच लोकनृत्यांसंदर्भात माहिती दिली. कर्नाटकात 200 हून अधिक लोक  कलाप्रकार आहेत , या कलाप्रकारांच्या नावांचा उल्लेख करत त्यांनी यासंदर्भात संक्षिप्त माहिती दिली. कर्नाटकात ढोलु कुनिथा, गोरवारा कुनिथा, पुजा कुनिथा, चक्री भजन, लंबानी नृत्य इत्यादी काही सुप्रसिद्ध लोकनृत्य आणि आदिवासी नृत्य आहेत. कर्नाटकचे लोकसाहित्य , प्रादेशिक साहित्य संपूर्ण देशाला शांतता आणि समृद्धीचा संदेश देते,असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!