संभाजी ब्रिगेड मार्फत “हेंगडे पाटील यांचे सिल्वासा-गुजरात” येथे ‘शंभुचरित्रावर व्याख्यान’….

नाशिक –

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती भारतीय केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली, सिलवासा (गुजरात) येथे संभाजी ब्रिगेड शाखा सिलवासा, दादरा नगर हवेली यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेली होती. याप्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत शंभूचरित्र व्याख्याते श्री.समाधान हेंगडे पाटील यांचे ‘शंभू चरित्रा’ वरील व्याख्यान झाले

छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान या राष्ट्राच्या इतिहासासाठी फार महत्त्वाचे ठरले, आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने इथल्या जनसामान्य माणसाला लढण्याची प्रेरणा दिली रयतेला लढायला प्रवृत्त केले, आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही महाराष्ट्रातील,स्वराज्यातील माणसं औरंगजेबाशी कडवी झुंज देत राहिली, इतका तेजस्वी इतिहास संभाजी राजांचा आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आज घराघरात पोहोचायला हवा. आणि संभाजी महाराजांचे कर्तुत्व प्रत्येक सामान्य व्यक्तीत निर्माण व्हायला हवे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते समाधान हेंगडे पाटील यांनी सिल्वासा येथे केले.

सदर कार्यक्रम संभाजी ब्रिगेड शाखा सिलवासा, दादरा नगर हवेली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते समाधान हेंगडे पाटील उपस्थित होते. तसेच मराठा सेवा संघाचे सिलवासा अध्यक्ष अनंतराव निकम, मराठा सेवा संघाचे महासचिव व आकांशा वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष योगेश जी सोनवणे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशअध्यक्ष किशोर जाधव उपअध्यक्ष शरद पाडुळे, शेखर पाटील, सचिव प्रवीण महाजन, प्रसिद्धीप्रमुख संभाजी कारकर, संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष नवनाथ नांगराळे, अमोल पवळे, संतोष सोनी, निवृत्ती जोगी, विजय सहाने, अमृत पाटील, लुंबिनी बुद्धा विहर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण मेश्राम, सम्राट युवा मंचाचे अध्यक्ष विजय पगारे, आदी मान्यवरांसह संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि प्रचंड जनसमुदाय या कार्यक्रमासाठी उपस्थित होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!