मातृसन्मान सोहळा सत्कार करणारांनाही कर्तृत्वाची जाणीव आणि मूल्याधिष्ठीत पारंपारिक संस्कारांची दिक्षा देतो – उल्का चौधरी यांचे प्रतिपादन

[ भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे जागतिक मातृदिनानिमित्त आदर्श मातांचा सत्कार ]

जळगाव –

आपल्या प्रथितयश मुलांच्या शिल्पकार असूनही श्रेय न घेणाऱ्या … प्रतिकूल परिस्थितीत अविचल निष्ठा, त्याग, समर्पण व सदाचारी जीवनमूल्यांनी आमरण आचरण करणाऱ्या व्रतस्थ आदर्श मातांचा हृद्य सत्कार जागतिक मातृदिनानिमित्त निवासस्थानी अनपेक्षित जाऊन भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव तर्फे दिनांक ८ ते १० मे २०२२ कालावधीत करण्यात आला .

[ सत्काराचे स्वरूप व सन्मानार्थी माता : –

  • श्रीमती सुमती अनिल महाजन दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक यजुर्वेंद्र महाजन यांच्या मातोश्री यांचा सत्कार शुभहस्ते निवृत्त प्राध्यापक दिलीप चौधरी ( उपयोजित यंत्रशास्त्र विभाग प्रमुख, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,अमरावती )
  • सौ.सावित्री रवींद्र सोळुंके ( जनता बँक संचालिका जळगाव ) यांचा सत्कार शुभ हस्ते सौ.श्रद्धा ऋषी सोळुंके
  • सौ.दिप्ती पुंडलिक किनगे – सत्कार शुभहस्ते सौ. उल्का चौधरी ( स्व . स्वातंत्र्यसैनिक व प्रसिद्ध साहित्यिक भानु चौधरी यांच्या स्नुषा ) व योगशिक्षिका सौ.वर्षा किनगे
  • श्रीमती सिंधू सुपडू सुतार यांचा सत्कार शुभहस्ते संजय भावसार ( संस्थापक सावरकर मित्रमेळा, शिवाजी नगर )
  • श्रीमती इंदूबाई शांताराम बडगुजर सत्कार शुभहस्ते विजय लुल्हे ( भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव )
  • सौ.सरला मनोहर खोंडे सत्कार शुभहस्ते – सौ.वर्षा जगदीश बोरसे,तुषार खोंडे व सौ.राधा खोंडे ]

सत्कार करणाऱ्या मार्गदर्शकांचे अनमोल विचार : –

  • प्रा .दिलीप चौधरी : – आदर्श मातांचा सत्कार समाजाला दिपस्तंभासमान असतो. हा उपक्रम समाजाने चळवळ म्हणून उत्स्फूर्तपणे राबवावा.

सत्कारार्थी मनोगत
सौ.दिप्ती किनगे : – कौटुंबिक सौख्याचा पाया व सेवा समर्पणाचा कळस कुटूंब संस्थेसाठी करणाऱ्या चंदनाप्रती झिजणाऱ्या मातांचा सन्मान सोहळा औषधोपचारांपेक्षा महत्वाचा असल्याने निश्चितच दिर्घायुष्य व मानसिक आरोग्य देणारा ठरेल.
मातृसन्मान सोहळ्याची प्रेरणा निवृत्त डाएट प्राचार्य नीळकंठ गायकवाड,निवृत्त प्राथमिक विभाग शिक्षण उपसंचालक साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर ,निवृत्त माध्यामिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी दिली.कार्यक्रमास दिपस्तंभ स्पर्धा परिक्षा केंद्राचे संचालक यजुर्वेंद्र महाजन, संयोजक तथा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे ,जगदीश महाजन,ह.भ.प. मनोहर खोंडे, देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष चित्रकार सुनिल दाभाडे,राजकुमार गवळी,मनोबल दिव्यांग केंद्राचे व्यवस्थापक आर.डि.पाटील, वसतीगृह व्यवस्थापिका विद्या भालेराव, लेवा डान्स आयकॉन पुरस्कृत दिव्यांग नृत्यांगना मानसी पाटील, अँडमिन सम्राट माळवदकर,
संगणक प्रशिक्षक श्याम मिश्रा, सेवक पंकज गिरासे , रवि आर्ट क्लासेसचे संचालक ऋषी सोळुंके,ऋतिका कोळी, रिद्धी सोळुंके, पुंडलिक किनगे,श्रीमती सिंधु सुतार ,सुवर्णा लुल्हे, समिक्षा लुल्हे ,सर्वज्ञ स्मार्ट क्लास संचालिका सौ.सुरेखा बडगुजर , समिक्षा लुल्हे,सुदाम बडगुजर सर मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!