2024 मध्ये पंतप्रधानपदावरुन होणार मोदींची हकालपट्टी; लालू प्रसाद यादव यांनी वर्तवले भाकित

पाटणा

एक मोठे भाकित राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी वर्तवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2024 मध्ये हकालपट्टी होणार असल्याचे भाकित लालूप्रसाद यादव यांनी वर्तवले आहे. त्याचबरोबर त्यामागचे कारणही सांगितले आहे. तसेच त्यांनी पुढचे पंतप्रधान कोण होतील याबद्दलही भाष्य केले आहे.

द क्विंटला शुक्रवारी लालूप्रसाद यादव यांनी एक विशेष मुलाखत दिली. त्यांनी हे भाकित या मुलाखतीत वर्तवले आहे. मोदींची पदावरुन हकालपट्टी होईल, असे म्हणतानाच त्यांनी त्यामागचे कारणही सांगितले. ते म्हणाले, वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे देशातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2024 मध्ये हकालपट्टी होईल.

पुढचा पंतप्रधान कोण असेल, असे विचारले असता लालू म्हणाले की, यावर नंतर चर्चा केली जाईल. राहुल गांधी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, एक व्यक्ती काय बोलते किंवा विचार करते याने फरक पडत नाही. लालू म्हणाले की, सर्व समविचारी पक्ष आणि यूपीएच्या सर्व मंत्र्यांनी भेटून चर्चा करावी. राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का, असे विचारले असता ते म्हणाले की, याचे उत्तर आपण नव्हे, तर काँग-ेस पक्ष देईल.

समाजात ते जातीयवाद पसरवत आहेत. भाजपला जातीयवादामुळे निवडणुकीत फायदा होत राहील आणि सत्ता मिळत राहील, असे वाटते. जेव्हा मॉस्को येथील भगवान श्रीकृष्णाचे मंदिर तेथील लोकांनी उद्ध्वस्त केले. संसदेत मी बोललो. विश्व हिंदू परिषदेचे लोक तिथे जाऊन का थांबवत नाहीत? ते फक्त त्यांच्याच घरातील सिंह आहेत, गरीब मुस्लिमांना उद्ध्वस्त करण्यात आघाडीवर असल्याचे ते म्हणाले.

लालू यादव पुढे म्हणाले की, सर्व काही खासगी कंपन्यांना सरकार देत आहे. उद्योगपती काहीही मागतात, सरकार त्याचा लिलाव करते. रेल्वे खासगी क्षेत्राला देण्यात आली. तुमच्याकडे ट्रेनमध्ये टॉवेल आणि चादरही उपलब्ध नसल्यामुळे आता तुम्ही घरून जेवण, ब्लँकेट, चादर घेऊन प्रवास करा. सरकारने सर्व काही संपवले असल्याचे ते म्हणाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!