पोप फ्रान्सिसची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

रोम

जी-20 देशांच्या शिखर बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटली येथे पोहचले आहेत. आज पोप फ्रान्सिस यांची मोदींनी भेट घेतली. व्हॅटिकनमध्ये यावेळी पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची ही पहिलीच समोरा-समोर झालेली भेट होती. रोमन कॅथोलिकचे पोप, प्रमुख असतात, म्हणजेच ते ख्रिचनांचे धर्मगुरू असतात.

पंतप्रधान मोदी यांनी या अगोदर इटलीचे पंतप्रधान मारियो द्रागी यांची भेट घेतली होती. दोन्ही पंतप्रधानांमध्ये शिष्टमंडळस्तरावर चर्चा झाली. गार्ड ऑॅफ ऑॅनर देखील पंतप्रधान मोदींना देण्यात आला होता. याशिवाय पंतप्रधान मोदींनी यूरोपियन यूनियनच्या नेत्यांची देखील भेट घेतली. तर, पोप फ्रान्सिस यांच्याशी अतिशय प्रेमळ भेट झाली. मला त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि त्यांना भारतभेटीचे निमंत्रणही दिल्याचे पंतप्रधान मोदींनी पोप फ्रान्सिस यांच्या भेटीनंतर म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आपल्या द्विपक्षीय बैठकीत कृती आराखड्याद्वारे पंतप्रधान मोदी आणि इटलीचे पंतप्रधान द्रागी यांनी संबोधित केलेल्या धोरणात्मक क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला. ज्यामध्ये हवामान बदलाशी लढण्यासाठी स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्याच्या मुद्द्याचा समावेश आहे. तसेच, भारत आणि इटलीने आपापल्या उर्जा प्रणालींमध्ये नूतनीकरणक्षम उर्जेच्या वाढत्या प्रमाणात खर्च-प्रभावी एकत्रीकरणावर सहमती व्यक्त केली.

मोदींच्या रोम दौर्‍याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज उ-20 शिखर परिषदेला मोदी उपस्थित राहणार आहेत आणि संबोधितही करणार आहेत. याचबरोबर पंतप्रधान मोदी इंडोनेशियाचे राष्ट्रपती, फ्रान्सचे राष्ट्रपतींची देखील भेट घेणार आहेत. सिंगापूरच्या पंतपध-ानांशी देखील मोदींची भेट होणार आहे. या सर्व नेत्यांबरोबर पंतप्रधान मोदी जागतिक, आर्थिक, राजकीय व करोना महामारीबाबत स्वतत्रपणे द्विपक्षीय चर्चा करतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!