उत्तर प्रदेशमध्ये बसपाला सोडण्याचा नेत्यांचा क्रम सुरु

लखनऊ

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी बहुजन समाज पक्ष (बसपा)ला अभूतपूर्व पलायानाचा सामना करावा लागत असून मागील वर्षी सात आमदारांनी बंड केल्यानंतर बसपाला सोडून जाणार्‍या नेत्यांचा क्रम वाढला आहे. पक्षातील अनेक नेते अजूनही समाजवादी पक्ष (सपा) च्या संपर्कात असल्याने बसपा समोर चिंता वाढली आहे.

बसपाचे राष्ट्रीय महासचिव आर.एस.कुशवाहानी सोमवारी सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांची लखनऊमध्ये पक्ष कार्यालयात भेट घेतली. मात्र या भेटीला शिष्टाचाराची भेट असल्याचे सांगितले गेले. परंतु कुशवाह कोणत्याही दिवशी सपामध्ये सामिल होऊ शकतात असे सांगितले जात आहे.

बसपाच्या एका नेत्याने सांगितले की कोणत्याही स्थितीमध्ये जर  कुशवाहा सपामध्ये सामिल झाले नाही तरी त्यांना या बैठकीनंतर बसपातून बाहेर केले जाईल.

या आधी बसपातून निष्कासित दोन आमदार लालजी वर्मा आणि राम अचल  राजभर यांनी अखिलेश यादवांंची शिष्टाचार भेट म्हणून भेट घेतली होती.

बसपाचे अन्य एक ज्येष्ठ आमदार आणि उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष सुखदेव राजभर यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती तर त्यांचा मुलगा कमलकांत राजभर मात्र सपात सामिल झाला होता.

सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरीनी म्हटले की सपा सत्तारुढ भाजपचा एकमेव पर्यायाच्या रुपात पुढे आला आहे. बसपामध्ये असंतोष गतीने वाढत आहे कारण जास्तीत जास्त नेते पक्ष सोडत आहेत. पक्ष सोडणार्‍यांमध्ये अधिकतर नेते दलित आणि ओबीसी समुदायातील आहेत.

सपामध्ये सामिल होण्याची तयारी करत असलेल्या बसपाच्या एका आमदाराने म्हटले की बसपावर आता ब-ाम्हणांचे शासन आहे. मी लखनऊमध्ये पक्षाच्या अध्यक्षांना भेटण्याचा अनेक प्रयत्न केले परंतु संधी मिळाली नाही. एक आमदार आपल्या पक्षाच्या अध्यक्षांना भेटू शकत नाही तर पक्षाकडून कोणती आशा केली जाऊ शकते का ?

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!