जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा निधी उपलब्ध करून द्यावे….

सुरगाणा प्रतिनिधी –

सुरगाणा तालुक्यात उन्हाळ्यामध्ये काही गावांमध्ये भिषण पाणीटंचाई निर्माण होते.त्यामुळे येथील महिलांना रानमेवा भटकावे लागते.महीलांना डोक्यावर हंडे घेवून कामे धंदे सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाणीटंचाई भेडसावत असल्याने मा.ना.श्री . गुलाबरावजी पाटील साहेब पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री याची सदिच्छा भेट घेऊन विविध ग्रामपंचायतीमध्ये ,गोंदुणे,राशा, चिंचपाडा,कुकुडणे, खुंटविहिर,म्हैसखडक, उंबरठान, अशा ग्रामपचायमधील गावाना काहीना पिण्यासाठी पाणी नाही.त्यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करावे अशी मागणी सुरगाणा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.त्याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे, अरुण सहारे, तुकाराम देशमुख, उमेश पालवा, गुलाब पवार, जयराम महाले अशा प्रकारे उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!