मोडाळेची वाटचाल लसीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीकडे..

शेतावर जात शेतकऱ्यांसह मजुरांचे प्रबोधन करत केले लसीकरण : आरोग्य कर्मचाऱ्यांचा उपक्रम

मोडाळे – शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतातील कामगार मजूर शेतकरी बांधव यांना प्रबोधन करून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करतांना वैद्यकीय अधिकारी डॉ विजय माळी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नाली डोंगरे,आरोग्य कर्मचारी सतीश जाधव,अश्या कार्यकर्ती विजया गांगुर्डे आदी.(छाया : त्र्यंबक जाधव)

इगतपुरी प्रतिनिधी – ( त्र्यंबक जाधव )

इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या मोडाळे परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण जोरात सुरू आहे. लसीकरणासाठी येथील आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोरोना लसीकरणा संदर्भात प्रबोधन करत शेतकरी बांधवांसह शेत मजुरांना कोरोना प्रतिबंधक लसिकरण देत आहेत.अद्याप लसीकरण झालेले नाही अश्या नागरिकांसाठी दोनही डोस उपलब्ध आहेत तरी नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन देखील आरोग्य कर्मचारी यांच्याकडून केले जात आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ एम बी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ विजय माळी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नाली डोंगरे,आरोग्य कर्मचारी सतीश जाधव,आशा कार्यकर्त्या विजया गांगुर्डे यांनी मोडाळे येथे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जात शेतकऱ्यांसह शेतातील मजुरांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण जनजागृती प्रबोधन करून कोरोना लसीकरण पूर्ण केले. दरम्यान सध्या भात सोंगणी अंतिम टप्प्यात असतांना शेतकऱ्यांच्या शेतावर मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात कामात व्यस्त आहे.याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात शेतकरी बांधवांच्या झाप वस्त्यांवर जात या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कोरोना लसीकरण राबविले जात आहे. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याकडे वाटचाल करीत असून लवकरच उच्चांक पूर्ण करू अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ विजय माळी यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!