दरडग्रस्त साखर-सुतारवाडी अन् केवनाळेपर्यंत कंटेनर केबिनचा ट्रेलर पोहोचण्यास झाली अरूंद व कमकुवत रस्त्यांची अडचण

पोलादपूर

तालुक्यातील केवनाळे आणि साखर सुतारवाडी या गावांवर यंदा दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर उर्वरित बाधित दरडग्रस्त घरांतील कुटूंबियांची तात्पुरती पर्यायी निवासव्यवस्था करण्यासंदर्भात कंटेनर केबिन घेऊन जाणारा ट्रेलर दोन्ही दरडग्रस्त गावांपर्यंत जाण्यास अरूंद आणि कमकुवत रस्त्यांची अडचण निर्माण झाल्याने पितळवाडी येथे दोन कंटेनर केबिन एका शेतामध्ये उतरवून घेण्यात आले आहेत.

पेणचे प्रांताधिकारी व पोलादपूर तालुक्यातील आपत्ती निवारणव्यवस्थापनाचे प्रतिनियुक्तीवर असलेले विठ्ठल इनामदार यांनी पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीकडून मागितलेले दोन कंटेनर केबिन घेऊन एक ट्रेलर गेल्या आठवड्यामध्ये पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावाकडे चालला असताना पितळवाडी गावापासून केवनाळे फाट्याकडे वळल्यानंतर अरूंद रस्त्यामुळे ट्रेलर अडकून कमकुवत रस्त्यामुळे खचू लागला होता. यामुळे देवळे ग-ुपग-ामपंचायत हद्दीतील केवनाळे या दरडग-स्त गावातील बाधित कुटूंबियांच्या तात्पुरत्या निवास व्यवस्थेसाठी पेण तालुक्यातील डोलवी येथून मागविण्यात आलेले दोन कंटेनर केबिन हे येथे ट्रेलर पोहोचू शकत नसल्याने पितळवाडी रस्त्यालगत शेतामध्ये ठेवण्यात आलेले आहेत.

केवनाळे येथील दरडग-स्त बाधित कुटुंबियांपैकी अनेक जण हे मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने सध्या काही दिवस पर्यायी निवास व्यवस्थेची गरज भासली नाही तरी सदर कुटूंबीय उपचारानंतर गावी परत आल्यावर त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. याखेरिज, साखर सुतारवाडी येथील घरांच्या जागांपर्यंतदेखील हे कंटेनर केबिन पोहोचविता येणार नसल्याचे अरूंद आणि कमकुवत रस्त्यांमुळे स्पष्ट झाले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!