रेल्वेत विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी एनसीबीच्या बड्या अधिकार्‍याला अटक!

लातूर,

रेल्वेमध्ये प्रवास करत असताना एका विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी एनसीबीच्या एका बड्या अधिकार्‍याला अटक करण्यात आलीय. उदगीर-लातूर रोड दरम्यान एका विद्यार्थिनीची छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार हैदराबाद-हडपसर रेल्वे गाडीमध्ये रात्री घडला असून याप्रकरणी विद्यार्थिनीने एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. छेडछाड करणारा व्यक्ती हा एनसीबीचा अधिकारी आहे. एनसीबीचा अधीक्षक असलेल्या दिनेश अंकुश चव्हाण या अधिकार्‍याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळी येथील जीआरपी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 354, 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची माहिती अशी की काल रात्री हैदराबाद-हडपसर या रेल्वेने एनसीबीचा एक अधिकारी आणि एक विद्यार्थिनी प्रवास करीत असताना त्या अधिकार्‍याने विद्यार्थिनीची छेड काढली. त्यानुसार विद्यार्थिनीने रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपीस परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार लातूर रोड दरम्यान घडला आहे.

रेल्वेत विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी एनसीबीच्या बड्या अधिकार्‍याला अटक!

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले..

झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे म्हणणे आहे की दिनेश अनेक दिवस रजेवर आहे आणि तो वैयक्तिक समस्यांमुळे बाहेर आहे. समीर वानखेडे यांनी असेही सांगितले की दिनेश आमच्या कोणत्याही ऑॅपरेशनमध्ये सहभागी नाही, काही महिन्यांपूर्वी दिनेशचा अपघात झाला होता, त्यानंतर त्याला त्रास होत होता.

आरोपी दिनेश अंकुश चव्हाण (वय 35 वर्षे रा. ठी. सेक्टर 15, रुम नं.18, कोपरखैरणे, नवी मुंबई) हा नार्कोटीस्ट डिपार्टमेंट, भारत सरकार यांचा अधीक्षक दर्जाचा अधिकारी आहे. त्यांचेकडे ओळख पत्र असून एम.आर. पोलीस ठाणे, मुंबई शहर यांचे मार्फत याबाबत खात्री केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!