अखेर ’फिनॉमिनल हेल्थ’चा म्होरक्या लातूर पोलिसांच्या जाळ्यात, मुंबई विमानतळावरून केली अटक

लातूर,

राज्यासह देशाच्या विविध भागात ’फिनॉमिनल हेल्थ’ या आरोग्य विषयक पॉलिसीच्या माध्यमातून जाळे निर्माण करून हजारो लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी म्होरक्या नंदलाल ठाकूर यास मुंबई विमानतळावरुन सिनेस्टाईल अटक करण्यात आली आहे. लातूरच्या आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मुंबईत जाऊन ही संयुक्त कारवाई केली आहे.

आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल होते

आरोपी नंदलाल ठाकूर हा ’फिनॉमिनल हेल्थ’च्या संचालक मंडळाचा अध्यक्ष आहे. त्याने हजारो ग-ाहकांना दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात अडकवले होते. लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल होते. त्यामुळे हे प्रकरण शिवाजी नगर पोलीस ठाण्याकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. मागील दोन ते अडीच वर्षांपासून लातूर पोलीस आरोपी ठाकूर व त्याच्या साथीदारांचा शोध घेत होते. पोलिसांना प्राप्त खात्रीशीर माहितीवरून आरोपीला मुंबई विमानतळावरुन अखेर अटक करण्यात आली आहे.

अमिषापोटी हजारो ग-ाहकांनी पॉलिसी घेतल्या

लातूर येथील फिनॉमिनल हेल्थ केअर कंपनीच्या चालकाने लातूर शहरासह जिल्ह्यातील जवळपास दोन हजार नागरिकांना रकमेची दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवत आरोग्यविषयक सवलती देणार असल्याचे भासवले होते. या अमिषापोटी हजारो ग-ाहकांनी पॉलिसी घेतल्या होत्या. त्यातून फसवणूक झाल्याचे समजताच अनेकांनी पोलीस दफ्तरी तक्रारी दाखल केल्या आहेत.

विमानतळावर सापळा रचून त्याला अटक केली

तब्बल 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी (2018)मध्ये शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल होता. या प्रकरणी काही संचालकांना अटकही झाली होती. परंतु, प्रमुख आरोपी हा कंपनीचा चेअरमन नंदलाल ठाकूर हा मात्र पोलीसांना गुंगारा देत फरार झाला होता. त्यांच्याविरोधात लूकऑॅउट नोटीस जारी करण्यात आली होती. आरोपी ठाकूर हा परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती लातूर पोलीसांना मिळताच, मुंबई येथील विमानतळावर सापळा रचून त्याला अटक करून लातुरमध्ये आणण्यात आले आहे.

कंपनीच्या मालमत्तावरही टाच आणण्यात आली

लातूर पोलीसांनी आरोपी ठाकूरला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या तो लातुरच्या शिवाजीनगर ठाण्याच्या कोठडीत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी नंदलाल ठाकूर व त्याच्या मुलाने विविध बँक खात्यावर वळविलेली 3 कोटी 5 लाख रुपयांची रक्कम गोठविण्याची कारवाई केली आहे. त्याच्या इतर मालमत्तांचाही तपास केला जात आहे. शिवाय या कंपनीच्या मालमत्तावरही टाच आणण्यात आली आहे. शिवाय फसवणूक झालेल्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.

आमिष दाखवत गुंतवणूकदारांना फसवले

फिनॉमिनल हेल्थ केअर कंपनीच्या चेअरमनसह इतर 22 संचालकांविरोधात लातुरात गुन्हा दाखल झाला आहे. आता यातील फरार असलेल्या संचालकांचा शोध पोलीस घेत आहेत. यातील प्रत्येक आरोपीला अटक करण्याचे सुरु आहेत. यातील बहुतांश आरोपी संचालक हे नंदलाल ठाकूर याच्या जवळच्याच नातेवाईकांचा समावेश असल्याचे, तपासामध्ये समोर आले आहे. या संचालक मंडळाने संगनमत करुन विविध आमिष दाखवत गुंतवणूकदारांना फसविल्याचे तपासात पुढे आले असल्याची माहिती, पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!