जनमत प्रतिष्ठान कडून आरोग्य शिबीर संपन्न…

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी.

जळगाव शहरात-जनमत प्रतिष्ठान यांच्या वतीने नंदिनीबाई शाळेसमोर 21जुलै रोजी आरोग्य शिबिर घेण्यात आले, स्नायू ची स्थिती, शरीरातील फॅट, अतिरिक्त फॅट, बी एम आय, मेटाबॉलिझम, पाठीवरील फॅट, विनामूल्य तपासणी करण्यात आली,

त्याप्रसंगी जागतिक आरोग्य सल्लागार श्री गिरी जी साळवे अहमदनगर, वेलनेस कोच चे श्री,आदिनाथ शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले,
सदर कार्यक्रमा करीता
नासिक येथील विकास सपकाळ व प्रकाश सपकाळ, यांनी परिश्रम घेतले, सागर कोळी, विजय पाटील सर व जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांची उपस्थिती लाभली. जनमत प्रतिष्ठान तर्फे जळगाव जिल्ह्यामध्ये गोरगरीब वस्तीमध्ये सतत सेवा कार्य सुरू असते.

जळगाव शहरातील नागरिकांनी सदर कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे शिबिर घ्यावे अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. आरोग्य शिबिर व जनसेवे करिता जनमत प्रतिष्ठान सदैव अहोरात्र तत्पर असेल अशा भावना जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांनी बोलून दाखवले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!