आनंदा शिधात काही ठिकाणी साखर तर काही ठिकाणी इतर वस्तू कमी दिल्याने नारिकांना त्या-त्या वस्तुचे घेतलेले पैसे परत करण्यातबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्ह्यातर्फे निवेदन सादर

जळगाव प्रतिनिधी – शैलेंद्र ठाकूर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्ह्यातर्फे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे की चार महिन्यांपासून महाराष्ट्रात अस्तित्वात आलेले तोडफोडीचे खोकेबोके सरकार सर्वत्र लोकप्रियता मिळविण्याकामी नवनवीन ठराव व योजना बिनडोकपणे मंजूर करीत आहे. परंतु आर्थिक तरतूद व अमलबजावणी कामी अपूर्ण पडत असल्याने नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने रोषाला व तोंडघाशी व नजरेतून ही पडत आहे. अशीच एक योजना घाईघाईत नागरिकांपेक्षा नागपूरी मंत्र्यांच्या पंटरांना फायदा पोहोचावा याकरिता ३० सप्टेंबर रोजी ऑनलाईन निविदा जारी करण्यात येऊन ३ ऑक्टोबर रोजी घाईघाईत मंजूरीही देण्यात येऊन दि. ४ ऑक्टो. रोजी मंत्री मंडळ बैठकीत योजनेस मंजूरी देऊन अन्न व नागरी पुरवठा विभागाने शासन निर्णय काढला. यंदाच्या दिवाळीत राज्यातील एक कोटी सत्तर लाख शिधापत्रिका धारकांना एक किलो रवा, हरभरा डाळ, साखर व पामतेल अशा चार वस्तू शंभर रूपयांत देण्याची घोषणा सरकारने केली. जिन्नस खरेदी कामी ४७८ कोटी २४ लाख रूपये व इतर आनुपत्रीक ३५ लाख रूपये असे एकूण ५१३ कोटी २४ लाख रु. खर्च जिन्नस खरेदतून मिळणाऱ्या रकमेव्यतीरिक्त आणखी खर्च झाल्यास सरकारने देण्याची तयारी दर्शवली. चार वस्तूंचा दर खुल्या बाजारात २२५ रू. असून त्यासाठी सरकारने ३०३ रू. व इतर वाहतुक खर्च, थैली खर्च करण्याची सरकारने चालविली. मुळात ही योजना जाहीर झाल्यापासून वादात सापडली आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कन्झ्युमर फेडरेशना मालपुरवठ्याची निविदा मंजूर झाली असताना या फेडरेशनने नागपूरचा उपठेकेदार नेमला असून मंत्रीमंडळातील एक वजनदान मंत्र्याच्या सुचनेवरून त्या नागपूरच्या उपठेकेदारास काम देण्यात आले आहे.

एवढे सगळे करूनही महाराष्ट्रातील सात कोटी नागरिकांना “आनंदा शिधा दिवाळी अगोदर पुरविण्यास हे सरकार अपूर्ण पडले आहे व त्यातही देण्यात येणाऱ्या एक किला रवा, साखर, हरभरा डाळ, पाम तेल या सर्व चारही वस्तू पूर्णपणे देण्यास लायक ठरू शकले नसून काही ठिकाणी पामतेल गायब, काही ठिकाणी हरभरा डाळ गायब, काही ठिकाणी रवा गायब तर जळगाव जिल्ह्यात व काही जिल्ह्यात साखर गायब अशा एकेक वस्तू गायब करून शंभर रूपयात फक्त तिनच वस्तू देण्यात आल्या. शासन आदेशानुसार मोदी, शिंदे, फडणवीस यांचे फोटो असलेल्या पिशव्या व सर्व चारही वस्तू असल्याशिवाय वाटप करू नये असे सांगण्यात आले परंतु मोठ्या प्रमाणात टिका होऊ लागल्याने एखाद दोन वस्तू कमी असल्या तरी जशा असतील तशा व जेव्हढ्या असतील तेवढ्या वाटप करण्याचे शासन आदेश काढण्यात आले. मग ठरल्याप्रमाणे पूर्ण रक्कम म्हणजे १०० रू. घेण्यात आले. आनंदा शिधा वाटप योजनेत मोठा घोळ झाला असून फक्त उपठेकेदारास फायदा पोहोचावा या करिता ही योजना राबविण्यात आली असून जळगाव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भाजपा खासदार, आमदार, आजी-माजी नगरसेवक यांच्या हस्ते व देखरेखीखाली जनतेचा खिसा कापण्याचे व शासनाच्या तिजारीला लुटण्याचे काम करण्यात आले असून कमी वस्तू देण्यात आल्याने बाजारभावाप्रमाणे नागरिकांकडून घेण्यात आलेली रक्कम जनतेस परत करावी व या योजनते घोटाळा झाल्याने या उपठेकेदाराची व संबंधित मंत्र्यांची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात येत असून दिवाळी साजरी करण्याकामी महत्वाच्या वस्तू न दिल्याने गोरगरीब नागरिक दिवाळी साजरी करू न शकल्याने या सरकारचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात येत आहे.अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना शुक्रवारी २८ ऑक्टोबर रोजी देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महानगरचे जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, रिंकू चौधरी, अरविंद मानकरी, इब्राहिम पटेल, अशोक सोनवणे, अमोल कोल्हे, दत्तात्रय सोनवणे, रहीम तडवी, मजहर पठाण, रमेश बऱ्हाटे, राजू बाविस्कर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वृक्ष संवर्धन काळाची गरज….

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!