” क्रांतीसूर्य फुलेंनी उपेक्षितांना हक्कांची जाण, संघर्षाचे आत्मभान, शिक्षण हेच जीवन ही आत्मोद्धाराची त्रिसूत्री दिली ” :-पत्रकार शैलेंद्र ठाकूर.

[ अंनिस व भारतरत्न डॉ . कलाम पुस्तक भिशीतर्फे महात्मा फुले पुण्यातिथी संपन्न ]

” क्रांतीसूर्य फुलेंनी उपेक्षितांना हक्कांची जाण, संघर्षाचे आत्मभान व शिक्षण हेच जीवन ही आत्मोद्धाराची त्रिसूत्री दिली ” असे मार्मिक प्रतिपादन
दैनिक महाराष्ट्र सारथी चे कार्यकारी संपादक शैलेंद्र ठाकूर यांनी केले .

जळगाव -क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची पुण्यातिथी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व भारतरत्न डॉ .ए .पी .जे .अब्दुल कलाम पुस्तक भिशी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि . २८ नोव्हेंबर २०२१ रोजी कालिका माता मंदिर परिसरातील अंनिस कार्यकर्ते शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी संपन्न झाली . त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्रमुख अतिथी म्हणून दै. महाराष्ट्र सारथी चे कार्यकारी संपादक ठाकूर बोलत होते .

महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विशेष अतिथी लेवा आयकॉन पुरस्कार प्राप्त दिव्यांग नृत्यांगना मानसी पाटील व शलाका चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे आयोजक दिगंबर कट्यारे ( अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष ) व विजय लुल्हे ( जिल्हा प्रमुख, डॉ . ए .पी .जे .अब्दुल कलाम पुस्तक भिशी समुह ) यांनी केले . कार्यक्रमास सौ . कल्पना चौधरी ( महिला संघटक महाराष्ट्र अंनिस जळगाव शहर ) , शिरीष चौधरी (जिल्हा उपक्रम विभाग कार्यवाह ), सदस्य गुरुप्रसाद पाटील व सागर शिंदे, भागवत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्याध्यक्ष डिगंबर कट्यारे मार्गदर्शनात म्हणाले की, महात्मा फुले यांचे कार्य राष्ट्रीय सेवावृत्तीचे होते . पुस्तक भिशीचे जिल्हा प्रमुख विजय लुल्हे म्हणाले की, “महात्मा फुले यांनी पिढ्यानुपिढ्या नापिक पडलेल्या उपेक्षितांच्या मनोभूमीत प्रथमतःच क्रांतीबीजे पेरली ; सृजनशीलतेचे नंदनवन निर्माण करीत शोषितांच्या जगण्यात सप्तरंग भरुन त्यांचे जीवन सर्वार्थानं सार्थकी केले . महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून पुरोगामी समाज निर्मिती करून अंधश्रद्धेवर ओढलेले आसूड सांगितले. “
सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन पुस्तक भिशीचे क्रियाशील सदस्य सुदाम बडगुजर यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निवृत्त केंद्रप्रमुख शिवाजी भैय्या पाटील, प्रभारी केंद्रप्रमुख कवी अरुण वांद्रे, अंनिसचे विश्वजीत चौधरी व जितेंद्र धनगर,पंकज नाले, मुख्याध्यापक हेमंत धांडे, अभियंता मिलिंद काळे व प्रमोद माळी, निबंधकार वर्षा अहिरराव, गझलकारा आशा सोळुंके, विशाखा देशमुख, ह.भ.प .मनोहर खोंडे यांनी अमूल्य सहकार्य केले .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!